मुंबई महापालिकेतील शिवसेना नेत्यांचे मेतकूट जमले!

शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी तिघांनाही गोड शब्दांत सूचना केल्यानंतर तिन्ही बाजुला तोंड करून बसलेले महापौर किशोरी पेडणेकर, सभागृह नेता विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव तिघेही मंगळवारी एकत्र नालेसफाईची पाहणी करण्यासाठी निघाले.

143

मुंबई महापालिकेत सध्या एकहाती कारभार चालवणाऱ्या महापौरांना अन्य शिवसेना नेत्यांशी जुळून घ्यावेच लागले. आजवर महापौर, सभागृहनेत्या आणि स्थायी समिती अध्यक्षांची तोंडे तीन बाजुला असल्याने अखेर शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी जुळवून घेत एकत्रित पाहणी दौरे करण्याच्या सूचना केल्यानंतर या तिन्ही नेत्यांचे मेतकूट जमले आणि तिघांनीही मंगळवारी पश्चिम उपनगरातील नालेसफाईचा पाहणी केली.

…आणि सारे जण एकत्र जमले!

मंगळवारी पश्चिम उपनगरातील नालेसफाई कामांची मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी उप महापौर ऍड. सुहास वाडकर, सभागृह नेता विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यासमवेत पाहणी केली. महापौर व इतर पदाधिकाऱ्यांनी सर्वप्रथम एच/पूर्व विभागातील वाकोला नदी, एच/पश्चिम विभागातील एसएनडीटी नाला, के/पश्चिम विभागातील ओशिवरा लिंक रोडवरील ओशिवरा नदी,पी /दक्षिण विभागातील गोरेगाव पश्चिम लिंक रोडवरील शास्त्री नगर नाला, आर /दक्षिण विभागातील लिंक रोडवरील पोईसर नदी, आर/मध्य विभागातील बोरिवली पश्चिमच्या राजेंद्र नगर नाला, आर/ उत्तर विभागातील दहिसर (पश्चिम) मधील दहिसर नदीची पाहणी केली.

New Project 9 2

(हेही वाचा : पुढील आठवड्यात १७ ते २१ मे दरम्यान मुंबईत पाणीकपात)

आदित्य ठाकरेंनी सूचना केल्यानंतर झाला बदल!

मागील पावसाळ्यात स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी समिती सदस्य व इतर समिती अध्यक्षांसह पाहणी केली होती. परंतु यावेळी नालेसफाईच्या पाहणी दौऱ्याला महापालिकेतील नेते बऱ्याच वर्षांनंतर प्रथमच एकत्र आल्याचे पहायला मिळत आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोरोना काळात तत्कालिन आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले यांना सोबत घेवून रुग्णालयांचा आढावा घेतला होता. त्यानंतर विद्यमान आरोग्य समिती अध्यक्षा राजुल पटेल यांच्यासमवेतही त्या पाहणी करत आहेत. परंतु आजवर काही ठिकाणी सभागृह नेत्यांना सोबत घेत असल्या तरी काही ठिकाणी त्यांनाही डावलेले गेले आहे. त्यामुळे सभागृह नेत्यांनीही दादरमधील पहिल्या ड्राईव्ह इन लसीकरणाच्या शुभारंभाला महापौरांना डावलले आणि त्याबरोबरच शिवाजी पार्कच्या नुतनीकरणाच्या कार्यक्रमापासूनही त्यांना दूर ठेवले. त्यातच भाजप आता जास्त आक्रमक होत असल्याने शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी तिघांनाही गोड शब्दांत सूचना केल्यानंतर तिन्ही बाजुला तोंड करून बसलेले हे तिघेही मंगळवारी एकत्र नालेसफाईची पाहणी करण्यासाठी निघाले. यापूर्वीच्या महापौरांच्या काळात एकत्रपणे नालेसफाईची पाहणी केली जायची. परंतु मागील काही वर्षांपासून अशाप्रकारे एकत्र नालेसफाईची प्रथा खंडित झाली हेाती. पण ही प्रथा पुन्हा एकदा शिवसेनेच्या नेत्यांनी आपल्या नेत्यांचे कान पकडल्यानंतर सुरु झाल्याचे पहायला मिळत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.