माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमीत्ताने मुंबईत त्यांच्या एका पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार होते, मात्र राज्य सरकारने परवानगी नाकारल्याचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी म्हणाले. त्यामुळे आता पुतळ्याच्या अनावरणावरुन राजकारण होताना दिसत आहे.
भाजपाचा दावा
अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त कांदिवली येथे वाजपेयी यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार होता. परंतु, राज्य सरकारने पुतळा उभारण्यासाठी परवानगी दिली नाही असा दावा भाजपच्या वतीने करण्यात आला आहे. त्यामुळे शनिवारी होणारा पूर्णाकृती पुतळा उभारणीचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे.
( हेही वाचा: ‘सबका साथ, सबका विकास’ हे वाजपेयींनाच शोभतं, राऊतांचा केंद्राला टोला )
अधिवेशनात काॅपी, माफी आणि मिम्सचं राजकारण
राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला बुधवारपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी अधिवेशन चर्चेचा विषय ठरले, शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी विधान भवनात पंतप्रधान मोदींची नक्कल केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले. त्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर जाधवांनी जाहीर माफी मागितली. काॅपी- माफीच्या या नाट्यमय प्रकारानंतर नितेश राणेंची आदित्य ठाकरेंच्या एंट्रीच्या वेळची म्याॅव म्याॅव वाली नक्कल महाराष्ट्रभर गाजली, आता त्यांना प्रतिउत्तर म्हणून नवाब मलिकांनी मांजर आणि कोंबडा असे काॅकटेल चित्र शेअर करत, नितेश राणेंची खिल्ली उडवली. शनिवारी नितेश राणेंनी डुकराचा फोटो ट्विट करत, भंगारात आढळणा-या या प्रजातीला ओळखा पाहू, असे कॅप्शन देत सडेतोड उत्तर दिले आहे.
Join Our WhatsApp Community