- प्रतिनिधी
आम आदमी पक्षाच्या नेत्या आणि आमदार आतिशी मार्लेना यांनी शनिवारी (२१ सप्टेंबर) दिल्लीच्या आठव्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत आणखी पाच आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली. दिल्लीचे उप राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी शनिवारी आतिशी मार्लेना यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. त्या दिल्लीच्या आठव्या मुख्यमंत्री होय. याशिवाय गोपाल राय, कैलाश गेहलोत, सौरभ भारद्वाज आणि इम्रान हुसैन यांनी दिल्लीत कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. मुकेश अहलावत यांनीही कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. मुकेश अहलावत हे सुलतानपुरीचे आमदार आहेत. ते अनुसूचित जाती प्रवर्गातून येतात. ते राजकुमार आनंदची जागा घेतील. दिल्ली सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांसह एकूण सहा मंत्री आहेत. (Atishi CM Oath Ceremony)
(हेही वाचा – Dadar : महापालिका प्रशासन हप्ते देणाऱ्या फेरीवाल्यांसाठी आहे की करदात्यांसाठी; दादरच्या पुस्तक गल्लीची कधी होणार साफसफाई)
दिल्ली सरकारमध्ये सर्वाधिक मंत्रीपदे भूषवणाऱ्या ४३ वर्षीय अतिशी या सुषमा स्वराज आणि शीला दीक्षित यांच्यानंतर राष्ट्रीय राजधानीच्या मुख्यमंत्री बनणाऱ्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री होय. त्या दिल्लीच्या सर्वात तरुण मुख्यमंत्री देखील आहेत. अरविंद केजरीवाल यांनी गेल्या मंगळवारीच आपला राजीनामा एलजीकडे सोपवला होता. यानंतर आतिशी यांनी सरकार स्थापनेचा दावा केला होता. आतिशी यांच्या मंत्रिमंडळात चारही माजी मंत्र्यांना पुन्हा मंत्री करण्यात येत आहे. त्याचवेळी राखीव जागेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मुकेश अहलावत यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. (Atishi CM Oath Ceremony)
(हेही वाचा – Haryana Assembly Election : कुमारी सेलजा यांना निवडणुकीत काँग्रेसने केले बाजूला)
दिल्ली सरकारच्या नवीन मंत्रिमंडळाचे सरासरी वय सुमारे ४६ वर्षे आहे. २०२० च्या विधानसभा निवडणुकीत कालकाजी मतदारसंघातून विजयी झालेल्या ४३ वर्षीय मुख्यमंत्री आतिशी या मंत्रिमंडळातील सर्वात तरुण आहेत. ५० वर्षीय कैलाश गेहलोत हे या मंत्रिमंडळातील सर्वात वयस्कर आहेत. कैलाश गेहलोत हे नजफगडचे आमदार आहेत. याशिवाय अन्य तीन मंत्र्यांचे वय सौरभ भारद्वाज ४४ वर्षे, मुकेश अहलावत ४८ वर्षे आणि गोपाल राय ४९ वर्षांचे आहेत. (Atishi CM Oath Ceremony)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community