भाजपचे आमदार जयकुमार रावल यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. आदिवासी समाजाला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. यानंतर अॅट्रॉसिटीचा गुन्हा रद्द करावा, अशी मागणी भाजप पोलीस प्रशासनाकडे केली आहे.
(हेही वाचा – MSRTC: एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड? बोनस जाहीर होण्याची शक्यता)
या आरोपानंतर भाजपचे आमदार जयकुमार रावल यांच्याविरोधात कोणती कारवाई केली जाते याकडे साऱ्याचे लक्ष लागून राहिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार दसऱ्याच्या दिवशी घडला असून दोंडाईचा येथे दसऱ्याच्या निमित्ताने रावण दहनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या कार्यक्रमाला आदिवासी संघटनांनी विरोध केला होता. यावेळी रावणाच्या पुतळ्याची तोडफोड देखील करण्यात आली आणि वाद पेटला. तर या ठिकाणी जयकुमार रावल यांनी आदिवासी समाज बांधवांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आदिवासी संघटनांकडून करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणी दोंडाईचा येथील पोलीस स्टेशनमध्ये माजी मंत्री हेमंत देशमुख यांच्यासह भाजपच्या जयकुमार रावल यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे यामुळे सामाजिक आणि राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे सांगितले जात आहे.
Join Our WhatsApp Community