गोपीचंद पडळकरांना होणार अटक? अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल!

एसटी संपकरी कर्मचाऱ्यांचं आंदोलन असो किंवा स्पर्धात्मक परीक्षा असो भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर फसवणूक आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीने गोपीचंद पडळकर यांच्यासह त्यांचा भाऊ ब्रम्हानंद पडळकर यांच्यावर देखील आरोप केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महादेव वाघमारे यांनी सांगली जिल्ह्यातील आटपाडी पोलीस ठाण्यात झरे येथे या संदर्भातील तक्रार दाखल केली आहे.

पडळकरांवर नेमके कोणते आरोप

सांगली जिल्ह्यातील आटपाडी पोलीस ठाण्यात PC 420 सह म्हणजेच फसवणुकीसह अॅट्रॉसिटीचा गुन्हा गोपीचंद पडळकर आणि ब्रह्मानंद पडळकर या दोघांवर दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी वाघमारे यांनी पडळकरांवर जमीन व्यवहारात फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. वाघमारे याने केलेल्या तक्रारीनुसार, 2011 साली त्यांचा गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या बंधूंसोबत जमिनीचा व्यवहार झाला होता. याच व्यवहारासंदर्भात वाघमारे यांना काही आक्षेप आहेत. बनावट कागदपत्रे करुन फसवणूक केल्याचा त्यांचा आरोप आहे. तसेच फिर्यादी वाघमारे यांच्या मालकीच्या विहिरीतील पाणी वापरण्याच्या कारणावरून देखील त्यांनी फसवणूक आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.

(हेही वाचा – अजित पवारांच्या उपस्थितीत ‘लॉकडाऊन’चा महत्त्वपूर्ण निर्णय, वाचा…)

पडळकरांच्या जीवाला धोका?

महाविकास आघाडी सरकारवर नेहमी निशाणा साधणारे पडळकर यांच्या जीवला धोका असल्याचे त्यांनी सांगितले होते. यासह त्यानी माझ्या हत्येचा कट रचला जात असल्याचा आरोप केला होता. या संदर्भातील पडळकर यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. हा व्हिडिओ 7 नोव्हेंबर 2021 असल्याचा दावा केला आहे. तो व्हिडिओ आटपाडी पोलिस ठाण्याच्या दारातला असून तिथे माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा गोपीचंद पडळकर यांनी केला. तो हल्ला सुनियोजित असल्याचे त्यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण

सांगली जिल्हा बँकेच्या निवडणूक वादातून नोव्हेंबर महिन्यात आटपाडीत आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. यामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीसह त्याच्या ताफ्यातील काही गाड्या फोडल्या होत्या. तर राष्ट्रवादीचे युवक प्रदेश सरचिटणीस राजू जानकर यांच्या पायाला इजा झाली. पडळकर यांच्या गाडीने आपल्या अंगावर गाडी घातल्याचा आरोप राजू जानकर यांनी केला होता. आटपाडी पोलीस स्टेशन जवळील साठे चौकात ही घटना घडली होती. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ठरावावरून हा वाद सुरू झाला होता आणि तो विकोपाला गेला.

हत्येचा कट पोलिस संरक्षणात

आपली गाडी ज्या दिशेने येत होती त्याच्या बरोबर दुसऱ्या बाजूने 200 ते 300 लोकांचा जमाव लाठ्या काठ्यांसह उभा होता. पहिल्यांदा माझ्या गाडीवर दगडफेक करायची आणि गाडीचे स्पीड कमी झाल्यानंतर भरधाव वेगाने डंपर अंगावर घालायचा आणि जमावाकडून हमला करुन घ्यायचा असा सुनियोजित कट आखला होता, असे गोपीचंद पडळकर म्हणाले. आश्चर्याची बाब म्हणजे या सर्व हल्ल्याचे चित्रीकरण पोलिस करताना बघायला मिळतात. हा सगळा कट पोलिस सरंक्षणात घडवून आणला जात आहे. सदर घटना थांबवण्याचऐवजी पोलिस चित्रीकरणात मग्न होते, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here