बनावट भारतीय पासपोर्ट बनवून फिरणारा बांगलादेशी गजाआड

इर्शाद शहाबुद्दीन शेख (३३) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

बनावट कागदपत्रांच्या साह्याने भारतीय पासपोर्ट तयार करून परदेशवारी करणारा बांगलादेशी नागरिक हा अखेर दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) च्या जाळ्यात सापडला आहे. दिल्ली विमातळावरून त्या बांगलादेशी नागरिकाला अटक करण्यात आली. आरोपीला शनिवारी न्यायालयापुढे हजर करण्यात आले.

मुंबईहून दिल्लीला पथक रवाना झालेले!

न्यायालयाने ८ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. इर्शाद शहाबुद्दीन शेख (३३) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. बांगलादेशी नागरिक असलेला शेख हा भारतीय पासपोर्टच्या सहाय्याने आखाती देशात गेल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. त्यानुसार एटीएस त्याच्या शोधात होते. शुक्रवारी तो शाहजाह येथून दिल्लीला येणार असल्याची माहिती राज्य एटीएसला मिळाली. त्यानुसार पहिल्या विमानाने मुंबईहून पथक दिल्लीला रवाना झाले. त्यानंतर शेखला दिल्ली इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एटीएसने अटक केली.

(हेही वाचा : क्लीन अप मार्शलच्या नाड्या महापालिका आवळणार, घेणार ‘हा’ निर्णय)

बनावट कागदपत्रे देणाऱ्याची पाळंमुळं शोधून काढणार! 

शेख हा बांगलादेशातील नोहखली जिल्ह्यातील मालीपोडा गावातील रहिवासी आहे. त्याने बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने भारतीय पासपोर्ट तयार केले होते. आरोपीला मुंबईत आणण्यात आले आहे. आरोपीला बनावट कागदपत्र बनवण्यासाठी मदत करणाऱ्यांचा शोध एटीएसकडून सुरू आहे. तसेच आरोपीच्या परदेशवारी मागील कारणांचीही एटीएस चौकशी करत आहे. तसेच त्याला बनावट पासपोर्ट बनवून देणाऱ्याची देखील पाळेमुळे शोधून काढली जात आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here