खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या वाहनावर अज्ञातांचा हल्ला

119

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या गाडीवर सोमवारी रात्री अज्ञातांनी हल्ला केला आहे. यावेळी अज्ञात इसमांनी दगडफेक केली असल्याची घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. या हल्ल्यानंतर जळगावातील राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. रोहिणी खडसे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या प्रयत्नाचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे. या घटनेनंतर मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील हल्ल्याचा निषेध केला आहे. इतकेच नाही तर विधानसभेत या हल्ला प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

असा घडला प्रकार

मिळालेल्या माहितीनुसार, रोहिणी खडसे या चांगदेव येथून एका हळदी समारंभ कार्यक्रम नंतर मुक्ताईनगरकडे येत असताना सूतगिरणी परिसरात दोन मोटार सायकलवर आलेल्या चार अज्ञातांनी दगडफेक केली. ही दगड फेक केल्यानंतर अज्ञातांनी रॉडने रोहिणी खडसे यांच्या वाहनावर हल्ला केला. यावेळी वाहन चालकाने कार रस्त्यावरून बाजूला घेऊन रोहिणी खडसे यांच्यासह शेतात पळ काढला. म्हणून हे दोघे ही सुखरूप बचावले.

(हेही वाचा – देशातील पाच राज्यात विधानसभा निवडणूक होणार, पण…)

पोलिसांकडून तपास सुरू

दरम्यान, रोहिणी खडसे यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांना मिळताच त्यांनी रोहिणी खडसे यांची भेट घेऊन घटनेबाबत विचारपूस केली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून तपास सुरू असल्याची माहिती जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांनी दिली आहे. रोहिणी खडसे यांच्या वाहनावर झालेल्या भ्याड हल्याचा निषेध करतो. रोहिणी खडसे यांच्यावर झालेल्या हल्ल्याची चौकशी शासनदरबारी करणार असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. हे प्रकरण विधानसभेत मांडणार असून या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.