पुणे शहरातील सदाशिव पेठेत मंगळवारी (२७ जून) भर दिवसा रस्त्यावर एका तरुणीवर तरुणाने कोयत्याने केलेला हल्ला, एमपीएसी उत्तीर्ण दर्शना पवारचा काही दिवसांपूर्वी राजगडाच्या पायथ्याशी आढळलेला मृतदेह या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.
राज ठाकरे ट्विट करत म्हणाले की, काल पुण्यात एका तरुणीवर हल्ल्याची दुर्दैवी घटना घडली. भररस्त्यात बाकीचे लोकं बघत असताना लेशपाल जवळगे नावाचा तरुण तिथे होता म्हणून ती तरुणी बचावली. लेशपालने जे धाडस दाखवलं त्याबद्दल त्याचं मनापासून कौतुक, पण आसपास इतकी लोकं बघ्याच्या भूमिकेत का गेली किंवा जातात ह्याचं आश्चर्य वाटतं. अर्थात पुढे कशाला चौकशीचा ससेमिरा असा विचार लोकांच्या मनात येत असेलही कदाचित पण ह्यासाठी पोलिसांनी लोकांना आश्वस्त करायला हवं.
काल पुण्यात एका तरुणीवर हल्ल्याची दुर्दैवी घटना घडली. भररस्त्यात बाकीचे लोकं बघत असताना लेशपाल जवळगे नावाचा तरुण तिथे होता म्हणून ती तरुणी बचावली. लेशपालने जे धाडस दाखवलं त्याबद्दल त्याचं मनापासून कौतुक, पण आसपास इतकी लोकं बघ्याच्या भूमिकेत का गेली किंवा जातात ह्याचं आश्चर्य…
— Raj Thackeray (@RajThackeray) June 28, 2023
(हेही वाचा – राष्ट्रवादीचा नवा प्रदेशाध्यक्ष दोन दिवसांत ठरण्याची शक्यता; वरिष्ठ नेत्यांची मुंबईत बैठक)
तसेच राज ठाकरे यांनी पुढे सांगितले की, दर्शना पवारच्या हत्येची घटना नुकतीच घडलेली असताना, तसाच काहीसा प्रकार परत घडणे हे गंभीर आहे. सुशोभीकरणातून लोकांचे डोळे पुरेसे दिपलेत, त्यामुळे प्रशासनाकडून कायद्याचा धाक निर्माण होईल हे देखील बघायला सरकारची हरकत नसावी. आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगायला नको की असे प्रकार तुमच्या आसपास घडत नाहीत ना ह्याकडे डोळसपणे लक्ष ठेवा आणि वेळीच धावून जा.
सदाशिव पेठेत नेमकं काय घडलं?
पुण्यातील सदाशिव पेठेत दर्शना पवार हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता राहिली. एमपीएससीच्या विद्यार्थिनीवर एकतर्फी प्रेमातून तरुणाने कोयत्याने हल्ला केला. पण एमपीएससीची तयारी करणाऱ्या दोन तरुणांनी प्रसंगावधान दाखवत हल्लेखोर तरुणाला रोखले. यामुळे शेषपाल जवळगेचे सर्वच स्तरातून कौतूक होत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community