Nitesh Rane : राज्यात दंगली घडवून सत्तेत येण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न – नितेश राणे यांचा आरोप

जो माणूस अडीच वर्षांत फक्त २ तास मंत्रालयात गेला, त्याची बरोबरी मोदींशी होऊ शकत नाही.

155
Nitesh Rane : राज्यात दंगली घडवून सत्तेत येण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न - नितेश राणे यांचा आरोप

सर्वोच्च न्यायालयाच्या सत्ता संघर्षाच्या निकालानंतर आता राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेते एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडतांना दिसत नाही. अशातच गेल्या काही दिवसांपासून राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी दंगली होत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ठाकरे गटावर टीका करत ‘राज्यात दंगली घडवून सत्तेत येण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न आहे’ असा आरोप केला आहे.

नेमकं काय म्हणाले नितेश राणे?

“ह्या ज्या दंगली होत आहेत त्याचा मास्टर माईंड सिल्व्हर ओकमध्ये आलेला… शरद पवार साहेबांच्या बाजूला बसला होता. कलानगर हा त्याचा पत्ता आहे… दंगली घडवून मुख्यमंत्री होण्याची स्वप्न आजही जिवंत आहेत. १९९३ ला दंगली झाल्या आणि १९९५ ला सत्ता आली. अशी उद्धवजींची धारणा आहे. २००४ ला झालेल्या बैठकीत माजी सरचिटणीस अरुण बेतकेकर उपस्थित होते. ते याबाबत पुष्टी देऊ शकतात. या दंगली मध्ये उद्धवजी मास्टर माईंड आहेत का? याची चौकशी व्हावी”, असा आरोप भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे.

(हेही वाचा – Sanjay Raut : ‘सरकारमध्ये फक्त फडणवीसच शहाणे, बाकी सर्व अतिशहाणे’ – संजय राऊत यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका)

मुसलमान समाजात दंगली घडवून आपला मतदान वाढवायचं हा उद्धवजींचा प्लॅन परत एकदा होतोय का? हे पवार साहेबांनी ओळखावं. त्र्यंबकेश्वर मंदिरात जबरदस्ती चादर टाकण्याचा प्रयत्न झाला. हट्ट धरतात. आधी महाराजांच्या गडकिल्ल्यावर अतिक्रमण सुरू केलं. आता तर धार्मिक स्थळाचा कब्जा घेण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. उद्या घरात देखील येतील, असा भाषेत नितेश राणे (Nitesh Rane) यांनी टीका केली आहे.

हेही पहा – 

संजय राऊत आणि उद्धव ठाकरे नैराश्यात गेले आहेत – नारायण राणे

जो माणूस अडीच वर्षांत फक्त २ तास मंत्रालयात गेला, त्याची बरोबरी मोदींशी होऊ शकत नाही. लोकशाहीत हार-जीत ठरलेली असते. मी उद्धव ठाकरेंबाबतच्या प्रश्नावर उत्तर देणार नाही. संजय राऊतला सध्या काही काम नाही. पोपट शिवसेनेत होता, तेव्हा भरारी घेत होता आणि आता पोपट मेला का? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना काहीतरी स्टेटस आहे. त्यांच्याबद्दल कुणी आक्षेपार्ह बोलू नये. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे नैराश्यात गेलेत.. त्यामुळे ते काहीही बोलत आहेत. अशा शब्दांमध्ये नारायण राणे (Narayan Rane) यांनी टीका केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.