MVA सरकारच्या काळात शिंदे-फडणवीसांना गोवण्याचा प्रयत्न; चौकशीसाठी सरकारने नेमली एसआयटी

61
MVA सरकारच्या काळात शिंदे-फडणवीसांना गोवण्याचा प्रयत्न; चौकशीसाठी सरकारने नेमली एसआयटी
  • नागपूर, विशेष प्रतिनिधी

तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी केली जाईल, अशी ग्वाही कॅबिनेटमंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिली. भाजपचे परिषदेतील गटनेते प्रविण दरेकर यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करत, चौकशी मागणी केली होती. (MVA)

(हेही वाचा – गोहत्या थांबली नाही, तर कायदा हातात घ्यावा लागेल; विधानसभेत Nilesh Rane आक्रमक)

महाविकास आघाडी (MVA) सरकारच्या काळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना खोट्या गुन्ह्यात गोवण्यासाठी तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी दबाव टाकला होता. तत्कालीन पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्यावर ही जबाबदारी होती, असा जबाब संजय पुनामिया यांनी दिला आहे. या संदर्भातील व्हिडीओ क्लीप प्रसारमाध्यमांद्वारे व्हायरल केली. विधान परिषदेत याचे पडसाद उमटले. दरेकर यांनी ही क्लीप परिषदेच्या उपाध्यक्षा नीलम गोऱ्हे यांना सादर केली. फडणवीस यांनी महाविकास आघाडीचे (MVA) भ्रष्टाचार काढल्याने सूड भावनेचा प्रकार सुरू होता. प्रकरण गंभीर असून या घटनेची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी, पोलीस उपायुक्त पाटील यांना तातडीने निलंबित करावे, सरकारी वकील शेखर जगताप यांची पॅनलवरून काढावे, संजय पांडे यांना यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. गोऱ्हे यांनी याची दखल घेत, सरकारला कारवाई करण्याची सूचना केली.

(हेही वाचा – Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींना २,१०० रुपये कधी मिळणार?)

दरम्यान, कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांनी सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून पोलीस अधिकारी व्हिडीओ क्लिप प्रकरणात ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षेखाली एसआयटी चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले. शिवाय गरज भासल्यास माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांचीही चौकशी करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. (MVA)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.