सध्या देशात ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. जम्मू काश्मीरमध्ये मुस्लिम दहशतवादाला बळी पडलेल्या हिंदूंचं चित्रण करणाऱ्या ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट जर थिएटरमध्ये लावू दिला नाही, तर योग्य तो धडा शिकला जाईल, असा इशारा भातखळकरांनी थिएटर मालकांना दिला आहे, सोबतच हे ठाकरे सरकारच्या दबावामुळे घडत असल्याचं म्हणत, सरकारवर निशाणा साधला आहे.
भातखळकरांचं ट्वीट
( हेही वाचा मध्य रेल्वे ‘अशी’ होतेय मालामाल! )
काश्मीर फाईल्स हा सिनेमा तिकीट बारीवर धोधो बिजनेस करतोय, पण तरीही काही थिएटर मालक हा सिनेमा काढणार अशी चर्चा सुरू आहे. ठाकरे सरकारच्या दाबावामुळे हे सुरू आहे. काश्मिरी हिंदूंच्या वेदना दाखवणारा हा सिनेमा काढण्याचा प्रयत्न झाला तर थिएटर चालकांना योग्य तो धडा शिकवू हे याद राखा. pic.twitter.com/u1CzNs3vO9
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 13, 2022
करमुक्त करण्याची मागणी
जम्मू काश्मीरमधील हिंदू समाजावर मुस्लिम दहशतवाद्यांनी अनन्वित अत्याचार केले. याचं योग्य आणि खरं चित्रीकरण एका चित्रपटाच्या माध्यमातून या देशातील जनतेसमोर येत आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी भूमिका घेणारे मुख्यमंत्री हा चित्रपट अनेक लोकांनी पहावा याकरिता नक्कीच प्रोत्साहन देतील असा विश्वास आहे, असे पत्र लिहित आमदार अतुल भातखळकरांनी हा चित्रपट करमुक्त करण्याची मागणी सरकारकडे केली.
काश्मीर फाईल या सिनेमाला करमाफी द्या… माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी… pic.twitter.com/SUeE0CdpMw
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 12, 2022
Join Our WhatsApp Community