हे तर भोंदू हृदयसम्राट…; अतुल भातखळकरांची खोचक टीका

138

याकूब मेमनच्या कबरीवरून भाजपा-शिवसेनेत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. उद्धव सेनेचा उंबरा अलिकडेच ओलांडलेल्या सुषमा अंधारे त्यात आघाडीवर असून, देशातील पहिला दहशतवादी नथुराम गोडसेचे समर्थन करणाऱ्यांचे काय? हा प्रश्न संघ, भाजपला विचारला पाहिजे, असे वक्तव्य त्यांनी नुकतेच केले होते. त्याचा समाचार घेताना भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी थेट ठाकरेंवर निशाणा साधला असून, “माझ्या उद्धवला सांभाळून घ्या, असे बाळासाहेब का म्हणायचे हे लोकांच्या पुरते लक्षात आले आहे. प्रकरण अगदीच वाया गेलेले आहे… हे तर भोंदू हृदयसम्राट”, अशी खोचक टीका केली.

( हेही वाचा : महाराष्ट्रात प्राप्तिकर विभागाची शोधमोहीम; 5 कोटींहून अधिक अघोषित मालमत्ता जप्त )

याकूब मेननच्या कबरीवर फुले चढवणे, सजावट करणे हे वाईटच. त्याचे समर्थन कुणीच करु शकत नाही. मात्र याकूबची फाशी आणि त्याची अंमलबजावणी भाजपाच्या काळात झाली. जर अमेरिकन सरकार लादेनचा मृतदेह समुद्रात टाकते, तर अशीच कृती याकूब मेननच्या बाबतीत तुम्हाला का सुचली नाही? मूळात मृतदेह दफन करण्याची परवानगीच का दिली, असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला होता. देशातला पहिला दहशतवादी नथुराम गोडसेचे रक्तरंजित कपडे आजही जपून ठेवण्यात आले आहेत. अस्थीही जपून ठेवल्या जातात. जयंती, पुण्यतिथीच्या माध्यमातून दरवर्षी गांधींच्या फोटोला पुन्हा गोळ्या मारल्या जातात. हे तुमचं हिंदुत्व आहे का? याकूब मेननच्या कबरीचे समर्थन कोणीच करत नाही. त्याची चौकशीही झाली पाहिजे. मात्र नथुराम गोडसेचे समर्थन करणाऱ्यांचे काय? हा प्रश्न संघ, भाजपाला विचारायला पाहिजे, अशी टीकाही त्यांनी केली.

त्याला प्रत्यूत्तर देताना अतुल भातखळकर म्हणाले, मुख्यमंत्री जनाब उद्धव ठाकरे यांच्या विशेष कृपा प्रसादाचे मानकरी, दाऊद टोळीचे मालमत्ता प्रमुख नवाब मलिक यांनीच याकूबच्या कबरीचे प्रकरण दडपले होते.उद्धव ठाकरे हे मेमन कुटुंबियांवर एवढे मेहेरबान का होते? वक्फ बोर्डाकडे तक्रार झाल्यानंतरही सरकार अळीमिळी करून का बसले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “माझ्या उद्धवला सांभाळून घ्या, असे बाळासाहेब का म्हणायचे हे लोकांच्या पुरते लक्षात आले आहे. प्रकरण अगदीच वाया गेलेले आहे… हे तर भोंदू हृदयसम्राट, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.