महाराष्ट्र बंद हा बेकायदेशीरपणे पुकारलेला आहे. त्यामुळे येत्या ३ दिवसांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या तिघांच्या विरोधात आपण मुंबई उच्च न्यायालयात जाणार आहे. या बंदमध्ये झालेले नुकसान या तिनही पक्षांकडून वसूल करण्यात यावे, अशी मागणी करणार असल्याचे भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी सांगितले.
महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांमधून सोमवारी पुकारण्यात आलेल्या बंदमुळे भाजपा आमदार अतुल भातखळकर @BhatkhalkarA यांनी सरकारवर जोरदार टीका केली असून आता सरकारमधील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,नाना पटोले आणि जयंत पाटील यांच्यावर आपण याविरोधात केस ठोकणार असल्याचे त्यांनी सांगितले. pic.twitter.com/mgvtOCBlEJ
— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) October 11, 2021
हा बंद नव्हे राजकीय ढोंग!
महाभकास आघाडी सरकारने लखमपूर घटनेचे भांडवल करत आधीच बंद असलेला महाराष्ट्र आज पुन्हा एकदा यांच्या कर्तृत्वाने बंद करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. जनतेने हा बंद नाकारला, कारण लोकांना माहित आहे की, हे राजकीय ढोंग आहे. मराठवाड्यातील शेतक-यांना मदत नाही, साधी भेटही दिली नाही. सांगली, सातारा, कोल्हापूर, कोकण या भागातील शेतक-यांना अजून मदत देण्यात आली नाही. त्यांच्या घटक पक्षातील सदस्य राजू शेट्टी त्यांच्यावर टीका करतात. अशा वेळी उत्तर प्रदेशातील घटनेवर तुम्ही मगरीचे अश्रू ढाळता. त्यामुळे जनतेने हा बंद नाकारला. फक्त काही ठिकाणी गुंडगिरी करून, पोलिसांच्या मदतीने धाकदपटशहा करून बंद करण्याचा प्रयत्न केला, परंतु तोही अयशस्वी झाला आहे, असे आमदार अतुल भातखळकर म्हणाले.
Join Our WhatsApp Community