औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. रात्री 10 नंतर भाषण केल्याने कारवाईची मागणी करण्यात आली आहे. औरंगाबादच्या क्रांती चौक पोलीस ठाण्यासह इतर दोन ठिकाणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे औरंगाबादच्या दौ-यावर होते. या दौ-यादरम्यान, रात्री 10 नंतर भाषण केल्याने ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी रात्री 10 नंतर भाषण केल्याने, कारवाईची मागणी केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे औरंगाबाद येथे क्रांतीचौक आणि वेदांतनगर येथे भाषणं झाली. तक्रारदारांचे असे म्हणणे आहे की, सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे मुख्यमंत्र्यांनी उल्लंघन केले आणि रात्री 10 नंतर भाषण केले. त्यामुळे याची दखल घेऊन, योग्य ती कारवाई करण्याची मागणी तक्रारदारांकडून करण्यात आली आहे.
( हेही वाचा: स्वातंत्र्यदिनी सिडकोच्या 2500 घरांची सोडत )
Join Our WhatsApp Community