औरंगजेबाचं थडगं नेस्तनाबूत कधी होणार याची घोषणा सभेत करणार का? मनसेच्या गजानन काळेंचा सवाल

165

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बुधवारी औरंगाबाद येथे जाहीर सभा आहे. आता यावर मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी शिवसेनेला पुन्हा डिवचत या सभेत औरंगजेबाचं थडगं नेस्तनाबूत कधी होणार? याची घोषणा सभेत करणार का? असा खोचक सवाल केला आहे.

काय म्हणाले गजानन काळे

शिवसेनेवर अत्यंत आक्रमकरित्या टीका करण्यासाठी प्रसिद्ध असलेले मनसे नेते आणि प्रवक्ते गजानन काळे यांनी औरंगाबादच्या सभेनिमित्त एक ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सवाल केला आहे. या सभेसाठी शिवसेनेने होय …संभाजीनगर.. असे म्हणत बॅनरबाजी केली आहे. पण तुम्ही सभेत संभाजीनगर म्हणायच एवढं करुन झालं का? औरंगाबादचे संभाजीनगर कधी होणार? मुख्यमंत्री महोदय, असा सवाल गजानन काळे यांनी विचारला आहे.

( हेही वाचा: शिवसेना, मविआने उघडपणे पाठिंबा मागावा; ओवैंसींची गुगली )

औरंगजेबाचे थडगे निस्तनाबूत करणार का?

औरंगाबादमधील औरंगजेबाच्या कबरीवरुन मागच्या महिन्यात मोठा वादंग माजला होता. एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले होते. त्यावर संपूर्ण महाराष्ट्रातून हिंदुत्ववादी संघटनांनी ही कबरच काढून टाकण्याची मागणी केली होती. त्यामुळे आता बुधवारी होणा-या सभेत थडगे निस्तनाबूत करण्याची घोषणा होणार का? असा प्रश्न करत गजानन काळेंनी शिवसेनेला डिवचले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.