शिवसेनेने अनेकदा असं विधान केलं होतं की आम्हाला शेंडीजानव्याचं हिंदुत्व मान्य नाही. अनेकांचं म्हणणं आहे की हे संस्कार प्रबोधनकार ठाकरे यांच्याकडून घेतले आहेत. प्रबोधनकार ठाकरेंचं जीवन पाहिलं तर त्यांनी हिंदुत्वाला बाधा येईल असं काही केलेलं नाही. त्याकाळी जी सामाजिक, राजकीय परिस्थिती होती त्यानुसार त्यांनी लिखाण व भाषण केलं आहे. आताची परिस्थिती बदलली आहे.
( हेही वाचा : पुणेकरांनो आता हे अति झालं बरं का; पुणे, तिथे चप्पल तुटेपर्यंत नाचणे)
उद्धव ठाकरे यांच्या गटाने तर आता संभाजी ब्रिगेडशी आघाडी केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या अगदी विरोधात असलेल्या संभाजी ब्रिगेड या संघटनेशी आघाडी करताना त्यांना बाळासाहेबांना दिलेले वचन आठवले नसावे. असो.
त्यांना शेंडी जानव्याचं हिंदुत्व मान्य नाही. ठीक आहे. त्यांना संभाजी ब्रिगेडचा हिंदू द्वेष मान्य आहे. हेही ठीक आहे. पण शेंडी जानव्याचं हिंदुत्व नाकारत गोमुत्र स्वीकारावं का? असा प्रश्न उपस्थित करण्याचा प्रसंग ठाकरे गटाच्या शिवसेनेने आणला आहे. औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री ज्या रस्त्याने गेले त्या रस्त्यावर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी गोमूत्र शिंपडलं आहे. रस्ता शुद्ध व्हावा म्हणून शिवसेनेकडून हे विचित्र आंदोलन केलं आहे.
आता या कृत्याला काय म्हणावं? महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दिशेने चाललं आहे? उद्धव ठाकरेंना नेमकं काय हवंय? हिंदुविरोधी पुरोगामीत्व हवंय? हिंदुत्व हवंय?? की धार्मिक कट्टरता हवीय? त्यांचा पूर्ण गोंधळ उडालेला दिसतोय. त्यांना नेमका कोणत्या दगडावर पाय ठेवावा हे कळत नसावं. म्हणून ठाकरे व त्यांचा एक बोलतात एक आणि करतात एक. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अशी कृती करण हेच मुळात निषेधार्थ आहे. तसं पाहता शिंदेंनी बाळासाहेबांची शिवसेना जी राष्ट्रवादी आणि ब्रिगेडच्या ताब्यात जाणार होती, ती शिवसेना पावन केली आहे.
Join Our WhatsApp Community