मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद येथील सभा बहुचर्चित ठरली. विशेष म्हणजे या सभेपूर्वी पोलिसांनी १६ अटी शर्थी लावल्या होत्या. त्यामुळे पोलीस या सभेचा लेखाजोखा तयार करणार हे निश्चित होते. त्याप्रमाणे ही सभा होताच सोमवार, २ मे रोजी औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरे यांच्या ४५ मिनिटे भाषणाचा तब्बल ५ तास अभ्यास केला.
गृहमंत्र्यांच्या बैठकीत होणार निर्णय
राज ठाकरे यांची सभा झाल्यानंतर पोलीस डीसीपी अपर्णा गीते यांच्या पथकाने राज ठाकरे यांच्या भाषणाचा आणि सभेचा ५ तास अभ्यास केला आणि त्यांनी सभेआधी लावलेल्या अटी शर्थींपैकी कोणत्या अटी शर्थीचे उल्लंघन करण्यात आले, याचा आढावा पोलीस घेत आहेत. यामध्ये या सभेला १५ हजार उपस्थितीची मर्यादा घालून देण्यात आली होती, त्याचे उल्लंघन करण्यात आले आहे. यावेळी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजही तपासले आहे. पोलीस या प्रकरणी राज ठाकरे आणि सभेच्या आयोजकांवरही गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे. मंगळवार, ३ मे रोजी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे, त्यावेळी या पोलिसांच्या या अहवालावरही निर्णय घेण्यात येणार आहे, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलॆ.
(हेही वाचा शरद पवारांना हिंदू शब्दाची ऍलर्जी! १५ वर्षे जातीवरून माथी भडकावली! राज ठाकरेंचा हल्लाबोल)
Join Our WhatsApp Community