मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा औरंगाबाद दौरा रद्द; काय आहे कारण?

141

औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या औद्योगिक प्रदर्शन अॅ़डव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पोसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजेरी लावणार होते. मात्र, विमानातील तांत्रिक बिघाडामुळे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनीही औरंगाबाद दौरा रद्द केला आहे. विशेष म्हणजे विमानात झालेल्या तांत्रिक बिघाडानंतर मुख्यमंत्री तासभर विमातळावर थांबले होते. मात्र, बिघाड दुरुस्ती न झाल्याने त्यांनी औरंगाबाद दौरा रद्द केला आहे.

( हेही वाचा: अयोध्येत उभे राहणार ‘महाराष्ट्र भवन’; योगी आदित्यनाथ यांचा होकार )

…म्हणून औरंगाबादचा दौरा रद्द

औरंगाबादच्या शेंद्रा एमआयडीसीतील डीएमआयसी ऑरिक येथे 5 ते 8 जानेवारी 2023 दरम्यान उद्योजकांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या अॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पोचे ऑनलाइन उद्घाटन होणार आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकूण आठ मंत्री हजेरी लावणार होते. मात्र, मुंबई मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मुंबई विमानतळावर पोहचल्यावर त्यांच्या विमानाच्या जनरेटरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले. तासभर प्रयत्न करुनदेखील यात दुरुस्ती होऊ न शकल्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी औरंगाबाद दौरा रद्द केला आहे. तर दोन्ही नेते मुंबई विमानतळावरुन पुन्हा परत निघून गेले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.