उद्धव ठाकरे यांचे नवीन आराध्य दैवत है औरंगजेब झाले आहेत. लवकरात लवकर तुम्हाला असे दिसेल की मातोश्रीमध्ये बाळासाहेबांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोच्या बाजूला औरंगजेबाचा फोटो लावतील, आणि हळू-हळू ज्या दिशेने उबाठाचा कारभार सुरू आहे, त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो ते काढतील, अशी जहरी टीका संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी केली आहे.
हेही वाचा-Online Gaming वर केंद्र सरकारचे निर्बंध ; 2,400 बँक खाती, 357 वेबसाइट केल्या ब्लॉक
ते पुढे बोलताना म्हणाले, “उबाठामध्ये जे काही सुरू ओह त्या गोष्टीचा मी निषेध करतो. उद्धव ठाकरे हे हिंदूविरोधी भूमिका घेत आहात, हे तुमची चुकी आहे. वक्फ बोर्डबद्दल जी सुधारणा सुरू आहे त्यात उबाठाने घेतलेली भूमिका चुकीची आहे. उद्धव ठाकरेंनी मौलानासोबत बैठक घेतली आणि या बैठकीचे नियोजन संजय राऊत यांनी केले आहे.” (Sanjay Nirupam)
हेही वाचा- Judge Yashwant Verma यांच्याकडे न्यायालयीन काम सोपवू नका ; सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचे आदेश
“उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना महाराष्ट्रातील दंगल खोरांची काळजी वाटत आहे. नागपूरच्या दंगलीमध्ये हिंदू लोकांचा हात होता ह्या राऊतांच्या विधानाचा मी निषेध करतो, मुस्लिम मतांसाठी उबाठा लाचार झाली आहे. नागपूरमधील दंगलीत 104 गाड्यांचे नुकसान करण्यात आले. ह्या दंगलखोरांचा संपर्क बांगलादेशमध्ये असल्याचे पुढे आले आहे. ज्याला काल अटक झाली तो सोशल मिडीयावर प्रसिद्ध असून त्याने मुजाहिद्दीन तयार करण्यासाठी पैसे जमा केले आहेत. तोच फहीम खानचा मेंटर आहे.” असं निरुपम यांनी म्हटलं आहे. (Sanjay Nirupam)
शुभ प्रभात! pic.twitter.com/sNpKXDF0ev
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 22, 2025
संजय निरुपम म्हणाले की, उद्धव ठाकरे हे आता मुस्लिम धार्जिणे होत असल्याचे आम्हाला त्यांच्या पक्षाच्या लोकांच्या वागण्यातून दिसून येत आहे. संजय राऊत यांनी यावर एक ट्विट केले आहे. ते असे आहे की, टीचर : तुम्हारे पापा क्या करत है? स्टूडेंट : जी वौ अंधभक्त है हिंदू त्यौहारोपर मस्जिद के बाहर नाचते है, असे राऊतांचे ट्विट वाचून दाखवले. राऊत असे करत हिंदू लोकांची बदनामी करत आहे. असंही निरुपम यांनी म्हटलं आहे. (Sanjay Nirupam)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community