Ayodhya Ram Mandir : सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांना राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण; अधीर रंजन चौधरी यांनाही निमंत्रण

अयोध्येत २२ जानेवारीला राम मंदिराच्या अभिषेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या नेत्रदीपक सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी देशभरातील राजकीय पक्षाचे नेते आणि मान्यवारांना आमंत्रित करण्यात आले आहे.

292
Ayodhya Ram Mandir : सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांना राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण; अधीर रंजन चौधरी यांनाही निमंत्रण
Ayodhya Ram Mandir : सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांना राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण; अधीर रंजन चौधरी यांनाही निमंत्रण

काँग्रेस संसदीय मंडळाच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण पाठविण्यात आले आहे. याशिवाय राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chaudhary) यांना सुद्धा निमंत्रित करण्यात आले आहे. (Ayodhya Ram Mandir)

अयोध्येत २२ जानेवारीला राम मंदिराच्या अभिषेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या नेत्रदीपक सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी देशभरातील राजकीय पक्षाचे नेते आणि मान्यवारांना आमंत्रित करण्यात आले आहे. सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांना कार्यक्रमाची पत्रिका मिळाली असल्याची माहिती काँग्रेसच्या मिडिया विभागाचे प्रमुख जयराम रमेश यांनी दुजोरा दिला आहे. तर, अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chaudhary) यांनी स्वतः ते कार्यक्रमाला जाणार असल्याचे म्हटले आहे. (Ayodhya Ram Mandir)

(हेही वाचा – JDU : ललन सिंह यांचा जेडीयूच्या अध्यक्षपदाचा राजीनामा)

ज्यांना निमंत्रण मिळालेले नाही तेच जास्त बोलत आहेत – जयराम रमेश

जयराम रमेश म्हणाले की, दोन्ही नेत्यांना आमंत्रण मिळाले आहे. मात्र यावर अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल आणि सर्वांना कळविण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सोनिया गांधी (Sonia Gandhi) राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. अशा बातम्या मीडिया रिपोर्ट्च्या आधारावर दिल्या जात होत्या. यावर बोलताना जयराम रमेश म्हणाले की, यावर अद्याप निर्णय झालेला नाही. लवकरच निर्णय घेऊन कळविण्यात येईल. ज्यांना निमंत्रण मिळाले आहे ते शांत बसले आहेत. परंतू ज्यांना निमंत्रण मिळालेले नाही तेच जास्त बोलत आहेत, असा टोला सुद्धा त्यांनी यावेळी लगावला. (Ayodhya Ram Mandir)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.