अयोध्येच्या जमिनीचा ‘तो’ करार १० मिनिटांतील नव्हे, तर १० वर्षांपूर्वीचा! 

जी जमीन दोन कोटी रुपयांची सांगून, ती 18.50 कोटी रुपयांत विकत घेण्यावर आक्षेप घेत आहेत, तिचा ठरलेला भाव चार हजार आठशे रुपये चौरस मीटरने देखील त्याची किंमत पाच कोटी 79 लाख 84 हजारपर्यंत जाते, असे ट्रस्टने म्हटले आहे.

अयोध्येतील श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टवर दोन कोटी रुपयांची जमीन १० मिनिटांतच 18.50 कोटी रुपयांत खरेदी करून यात कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप आप आणि समाजवादी पक्षाने केला. त्याला १ दिवस उलटत नाही तोच ट्रस्टने तात्काळ याचा खुलासा करत हे आरोप बिनबुडाचे असल्याचे स्पष्ट केले. त्यामध्ये संबंधित जमिनीचे करार १० मिनिटांपूर्वी नव्हे तर ४ मार्च 2011 रोजीच म्हणजे 10 वर्षांपूर्वीच मो. इरफान, हरिदास तथा कुसूम पाठक यांनी दोन कोटी रुपयांत रजिस्टर्ड अ‍ॅग्रीमेंटद्वारे केले होते, असे ट्रस्टने म्हटले आहे.

तीन वर्षांपूर्वी या अ‍ॅग्रीमेंटचे नुतनीकरणही करण्यात आले. 2017 मध्ये हरिदास तथा कुसूम पाठक यांनी जमिनीचे मालक नूर आलम, महफूज आलम आणि जावेद आलम यांच्याकडून या जमिनीचा लेखी करार केला आणि हरिदास व कुसूम पाठक यांच्याकडून ही जमीन 17 सप्टेंबर 2019 रोजी रविमोहन तिवारी, सुल्तान अंसारी आदी आठ लोकांनी अ‍ॅग्रीमेंट करून घेतली. तसेच रविमोहन तथा सुल्तान अंसारी यांनीच या जमिनीचा 18 मार्चला विक्रीसंदर्भात लेखी करार केला, असे ट्रस्टने म्हटले आहे.

(हेही वाचा : खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नूः पाकिस्तानने पढवलेला ‘पोपट’)

जमीन अत्यंत कमी पैशात खरेदी केली! 

जी जमीन दोन कोटी रुपयांची सांगून, ती 18.50 कोटी रुपयांत विकत घेण्यावर आक्षेप घेत आहेत, तिचा ठरलेला भाव चार हजार आठशे रुपये चौरस मीटरने देखील त्याची किंमत पाच कोटी 79 लाख 84 हजारपर्यंत जाते. तर बाग बिजेसी तथा रामनगरीच्या जवळपसच्या जमिनीचा सध्याचा सरासरी भाव २ हजार रुपये चौरस फूट आहे आणि याचा विचार करता, ट्रस्टने संबंधित जमिनीसाठी सरासरी किंमतीपेक्षाही अत्यंत कमी किंमत मोजली आहे. संबंधीत जमिनीचे क्षेत्रफळ 12 हजार 80 चौरस मीटर, म्हणजेच १ लाख 29 हजार 981 चौरस फूट आहे. आणि या हिशेबाने ट्रस्टने 1 हजार 423 रुपये चौरस फूट प्रमाणे जमिनीसाठी पैसे मोजले आहेत, असेही ट्रस्टच्या खुलासा पत्रात म्हटले आहे. .

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here