तब्बल साडेपाचशे वर्षांचा प्रदीर्घ संघर्ष आणि प्रतीक्षेनंतर आज, सोमवारी अयोध्येतील मंदिरात श्रीराम (Ayodhya Ram mandir) मूर्तींची विधीवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. वैदिक मंत्रोच्चारात विधीपूर्वक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिजीत मुहूर्तावर श्रीराम मूर्तींला अभिषेक करत प्राणप्रतिष्ठा केली. याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही उपस्थित होते.
(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir : आज कारसेवकांचे आत्मे सुखावले, शरयू नदी हसली ; राज ठाकरे यांची पोस्ट व्हायरल)
तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिरातून (Ayodhya Ram mandir) तर नागपुरातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाईव्ह सोहळा पाहिला. यावेळी आजचा सोहळा हा डोळ्याचे पारणे फेडणारा होता असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सांगितले.
काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ?
जे रामाचे (Ayodhya Ram mandir) नाहीत ते कामाचे नाहीत, ज्यांनी राम मंदिर सोहळ्यावर बहिष्कार टाकला त्यांना सद्बुद्धी मिळो,अशी टीका मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांवर केली आहे. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले, काही लोकांनी सोहळ्यावर बहिष्कार घातला आहे, त्यांना सद्बुद्धी दिली पाहिजे. सर्वांनी या सोहळ्यात शामील झालं पाहिजे. काही लोकं प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत मात्र जे रामाचे नाहीत ते कामाचे नाहीत. (Ayodhya Ram mandir)
(हेही वाचा – Shri Ramlala pratishthapana : यापुढे अयोध्यामध्ये गोळ्यांचा आवाज नाही तर नामसंकीर्तन दुमदुमणार – योगी आदित्यनाथ)
राम भारताचा आधार आहे – पंतप्रधान मोदी
या सोहळ्यानंतर (Ayodhya Ram mandir) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की; “या सोहळ्याला काही जण विरोध करत आहेत. पण मी त्यांना सांगू इच्छितो, राम आग नाही; राम ऊर्जा आहे. राम भारताचा आधार आहे. राम भारताचा विचार आहे. राम भारतवासियांच्या अंतर्मनात विराजमान झाले आहेत. माझे सौभाग्य आहे, मला सागरापासून शरयूपर्यंत प्रवास करण्याचे सौभाग्य मिळाले.” (Ayodhya Ram mandir)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community