अयोध्येतील राम मंदिर केव्हा तयार होणार? अमित शाहांनी सांगितली तारीख

129

तारीख नोट करून ठेवा, पुढच्यावर्षी अयोध्येत १ जानेवारी २०२४ ला राम मंदिर बनून तयार झालेले असेल अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी दिली आहे. त्रिपुरामधील जाहीर सभेत शाहांनी राम मंदिराच्या निर्माणाबाबत माहिती दिली आहे. १ जानेवारी २०२४ पर्यंत अयोध्येत राम मंदिर बनून तयार झालेले असेल असे अमित शाह या सभेमध्ये सांगितले.

( हेही वाचा : ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनमधील भ्रष्टाचारावर ‘परिवर्तन पॅनल’ करणार प्रहार )

स्वातंत्र्यापासून कॉंग्रेसने राम मंदिराच्या उभारणीसाठी अनेक अडथळे आणले पण पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णय देण्यात आला. मंदिराचे भूमिपूजन झाले आणि तातडीने कामाला सुरूवात झाली असेही अमित शाह म्हणाले.

कॉंग्रेसवर टीका

मोदी सरकारच्या काळात गोष्टी बदलल्या कॉंग्रेसच्या काळात पाकिस्तानातून घुसखोर येऊन आमच्या जवानांना मारुन निघून जात होते पण मोदी सरकारच्या काळात थेट सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानला भारताने धडा शिकवला. तसेच त्रिपुरातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने ईशान्येकडील राज्यात दहशतवाद संपवून सर्वांगीण विकास केला असेही अमित शाह यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.