22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत श्री राम मंदिराचे (Ayodhya Shri Ram Mandir) उद्घाटन होणार आहे. त्याआधी कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या पोलिसांनी ३० वर्षांपूर्वी राम मंदिर आंदोलनात सहभागी झालेल्या हिंदूंच्या विरोधात तपास सुरू केला आहे. तीन दशकांपूर्वी झालेल्या या आंदोलनाशी संबंधित 1992 च्या प्रकरणात पोलिसांनी श्रीकांत पुजारीला अटक केली आहे.
त्यामुळे राममंदिर आंदोलनात सहभागी असलेल्या अन्य हिंदूंवर अटकेची टांगती तलवार आहे. पोलिस विभागाने एक विशेष टीम तयार केली आहे. या टीमने 1992 च्या राम मंदिर (Ayodhya Shri Ram Mandir) आंदोलनाशी संबंधित प्रकरणातील ‘संशयितांची’ यादी तयार केली आहे. या आंदोलनात धर्मांध मुस्लिमांच्या हिंसाचारामुळे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही पक्षांमध्ये जातीय संघर्ष झाला होता. याच क्रमाने 5 डिसेंबर 1992 रोजी हुबळी येथे मलिक नावाच्या व्यक्तीच्या दुकानाला आग लागली. या कथित जाळपोळीप्रकरणी श्रीकांत पुजारी याला हुबळी पोलिसांनी ताब्यात घेतले असून आता तो न्यायालयाच्या देखरेखीखाली आहे. पुजारी हा या प्रकरणातील तिसरा आरोपी आहे. याप्रकरणी अन्य 8 आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. तसेच हुबळी पोलिसांनी 300 संशयितांची यादी तयार केली आहे. या लोकांचा 1992 ते 1996 दरम्यान झालेल्या जातीय संघर्षाशी संबंध असल्याचा पोलिसांचा दावा आहे.
Join Our WhatsApp Community