Ayushman Card : आता एका क्लिकवर डॉक्टरांना मिळणार रुग्णांचा वैद्यकीय इतिहास

86
Ayushman Card : आता एका क्लिकवर डॉक्टरांना मिळणार रुग्णांचा वैद्यकीय इतिहास
Ayushman Card : आता एका क्लिकवर डॉक्टरांना मिळणार रुग्णांचा वैद्यकीय इतिहास

मुंबईसह राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी (Ayushman Card) येणाऱ्या रुग्णांचा वैद्यकीय इतिहास (medical history) आता डॉक्टरांना एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. यासाठी आयुष्मान भारत हेल्थ कार्ड (Ayushman Bharat Health Card) बनवण्याचे काम वेगाने सुरू आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, ३१ जानेवारीपर्यंत राज्यात साडेपाच कोटींहून अधिक लोकांची हेल्थ कार्ड बनवण्यात आली आहेत. ही हेल्थ कार्ड रुग्णालयातील ऑनलाइन डेटाशी लिंक करण्यात आली आहेत. यामुळे रुग्ण जेव्हाही डॉक्टरांकडे उपचारासाठी येतील तेव्हा त्यांचा वैद्यकीय इतिहास ऑनलाइन उपलब्ध होईल. त्यामुळे रुग्णांना कागदी फाइल्स हाताळण्या गरज भासणार नाही. (Ayushman Card)

नोंदीमध्ये आयडी आणि पासवर्ड
केंद्राच्या आयुष्मान भारत डिजिटल हेल्थ मिशनअंतर्गत राज्यातील नागरिकांसाठी आयुष्मान भारत हेल्थ कार्ड बनवली जात आहेत. वैद्यकीय नोंदी आणि प्रिस्क्रिप्शन ऑनलाइन उपलब्ध असल्याने रुग्णांवरील उपचारांची योग्य माहिती मिळेल. रुग्णाच्या आरोग्याच्या नोंदीमध्ये आयडी आणि पासवर्ड असेल, जो रुग्णाकडे राहील. याचा फायदा रुग्णांना होणार आहे. (Ayushman Card)

हेही वाचा-Lucknow होणार पहिली एआय सिटी; उत्तर प्रदेशचे अर्थमंत्री सुरेश खन्ना यांची माहिती

आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की हेल्थ कार्ड हे ओळखपत्रांसारखेच काम करते. या कार्ड क्रमांकावरून आयुष्मान भारत योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या सुविधांचा लाभ घेता येईल. या सुविधा वेबसाइट किंवा अॅपद्वारे केव्हाही मिळू शकतात. या हेल्थ कार्डमुळे रुग्णांना रांगेत उभे न राहता सरकारी रुग्णालयांमध्ये ओपीडीची पावती मिळू शकेल. यासह देशभरातील डॉक्टर, रुग्णालये आणि आरोग्यसेवा प्रदात्यांना हेल्थ आयडी कार्ड देऊन रुग्ण त्यांच्या सर्व वैद्यकीय नोंदी जसे की लॅब अहवाल, प्रिस्क्रिप्शन, रुग्णालयातील प्रवेश आणि डिस्चार्ज तपशील, एमआरआय अहवाल त्यांच्याशी शेअर करू शकतील. (Ayushman Card)

हेही वाचा- “पाकव्याप्त काश्मीर भारताने ताब्यात घेतला की…” ; परराष्ट्रमंत्री S. Jaishankar यांचे मोठं विधान

सामान्य नागरिकांसह डॉक्टर आणि परिचारिकादेखील आयुष्मान भारत डिजिटल मिशनशी जोडल्या गेल्या आहेत. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार ३१ जानेवारी २०२५ पर्यंत राज्याती ४९,७१३ डॉक्टर आणि परिचारिका या अभियानाशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे रुग्णांना त्यांच्या जवळच्या डॉक्टरांचीही माहिती मिळू शकणार आहे. याशिवाय या अभियानात नोंदणी केलेल्या पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी आदी २५ हजारांहून अधिक आरोग्यसेवा पुरवठादारांची माहितीही रुग्णांना सहज उपलब्ध होणार आहे. (Ayushman Card)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.