‘आजादी के अमृत महोत्सव’ प्रदर्शनात विमानतळ प्राधिकरणाला वीर सावरकरांचा पडला विसर

97

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी त्यांचे संपूर्ण जीवन राष्ट्राला समर्पित केले होते. त्यांचा जन्म महाराष्ट्रात झाला आणि त्यांचे मुंबईशी अतूट संबंध होते. परंतु भाजपशासित केंद्र सरकारच्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाला याचा विसर पडलेला दिसला. अथवा मागील अनेक दशकांपासूनच्या देशावरील डाव्या विचारांच्या प्रभावाचा त्यांच्यावरही परिणाम झाला आहे का, अशी शंका येऊ लागली आहे. कारण मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्राधिकरणाने लावलेल्या ‘आजादी के अमृत महोत्सव’ प्रदर्शनात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे साधे छायाचित्र लावण्यात आले नाही.

यासंदर्भात शहरातील जागरूक नागरिकांनी पत्रव्यवहारही सुरू केला आहे. ज्यामध्ये भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे (Airport Authority of India) या चुकीकडे लक्ष वेधण्यात आले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार वर्षभर शासकीय विभागातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर लावण्यात आलेले क्रांतिकारकांचे प्रदर्शन त्यापैकीच एक आहे.

(हेही वाचा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त शौर्याचा होणार सन्मान! 22 मे रोजी पुरस्कार प्रदान सोहळा)

नागरिकांनी सुरु केली मोहीम 

मुंबई विमानतळावरील प्रदर्शनात मुंबईशी संबंधित असलेल्या क्रांतिकारकांचा समावेश आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अंतर्गत हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म 28 मे 1883 रोजी भगूर, नाशिक येथे झाला. त्यांच्या तुरुंगमुक्तनंतरचा जीवन काळ मुंबईत गेला. पण भारतातील सरकारी विभाग याकडे लक्ष देत नाही. या विषयी आता नागरिकांनी उत्फुर्तपणे मोहीम हाती घेत या प्रकरणी सरकारकडे पत्रव्यवहार सुरु केला आहे. विमानतळाच्या कामासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरण, अदानी या कंत्राटदार कंपनीसह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही पत्रे पाठवली जात आहेत.

हुनर हाटमध्ये मंत्र्यांनी मान्य केली होती चूक

वांद्रे येथे आयोजित हुनर हाट प्रदर्शनात स्वातंत्र्यसैनिकांशी संबंधित चित्रांचे प्रदर्शनही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात लावण्यात आले होते. ज्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख नव्हता. याबाबतचे प्रकरण दिल्लीत पोहोचल्यावर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी या चुकीची चौकशी करण्याचे बोलले होते.

(हेही वाचा #HunarHaat अल्पसंख्यांक मंत्रालयाला वीर सावरकर, वासुदेव बळवंत फडके यांचा विसर)

या क्रांतिकारकांचा आहे समावेश 

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रदर्शनात १८५७ च्या पहिल्या मुक्तिसंग्रामातील योद्ध्यांचा समावेश करण्यात आला आहे. ज्यामध्ये पुरुषोत्तम काकोडकर, प्रीतिलता वड्डेदार, अल्लुरी सीताराम राजू, दुर्गाबाई देशमुख, करतार सिंह यांची नावे आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा समावेश आवश्यक 

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने हे समजून घेतले पाहिजे की, दोनदा काळ्यापाण्याची शिक्षा झालेले स्वातंत्र्यवीर सावरकर हे पहिले क्रांतिकारक होते. ज्यांनी १८५७चे युद्ध हे भारताचा पहिला स्वातंत्र्यलढा म्हणून घोषित केला आणि आपल्या लेखणीतून जगाला याची ओळख करून दिली. याशिवाय स्वातंत्र्यवीर सावरकरांचे मुंबई आणि महाराष्ट्राशी अतूट नाते आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.