आजादी का अमृत महोत्सव : केंद्राच्या ‘या’ खात्याकडून वीर सावरकरांचा सन्मान!

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा फोटो छापून त्यांचा सन्मान करण्यात आला. मात्र यामुळे ट्विटरवर अनेकांना पोटशूळ उठला, त्यामुळे 'सावरकर', 'नेहरू' असा ट्रेंड दिवसभर होता.

केंद्र सरकारने देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे होत आहेत, त्यानिमित्ताने सरकारने हे वर्ष अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करत आहेत. त्यासाठी विविध खात्याकडून वर्षभर कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. त्यासाठी विविध खात्यांनी त्यांच्या त्यांचा परीने अमृत महोत्सवानिमित्ताने बॅनर बनवले आहेत. तसाच बॅनर भारतीय इतिहास अनुसंधान परिषदेच्या वतीने बॅनर बनवण्यात आला आहे. त्यामध्ये स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख नेत्यांचे फोटो छापण्यात आले आहेत. त्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा फोटो छापून त्यांचा सन्मान करण्यात आला. मात्र यामुळे ट्विटरवर अनेकांना पोटशूळ उठला, त्यामुळे ‘सावरकर’, ‘नेहरू’ असा ट्रेंड दिवसभर होता.

कसा आहे ‘तो’ बॅनर? 

या बॅनरमध्ये महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर, भगतसिंग, सरदार वल्लभभाई पटेल, आणि डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे फोटो आहेत. भारतीय इतिहास अनुसंधान परिषदेच्या संकेतस्थळावर हा बॅनर झळकला आहे. स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख नेत्यांमध्ये वीर सावरकरांचा समावेश करून त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यामुळे अनेकांच्या पोटात पोटशूळ उठला आहे. त्यावर लगेचच ट्विटरवर ‘सावरकर’ असा ट्रेंड ट्विटरवर सुरु झाला. त्यावर राष्ट्रप्रेमी नागरिकांनी त्याचा सडेतोड भाषेत समाचार घेतला.

जवाहरलाल नेहरूंचा फोटो नसल्याने पोटशूळ! 

या बॅनरमध्ये जवाहरलाल नेहरू यांचा फोटो छापण्यात आला नाही. त्यामुळे विशेषतः काँग्रेसच्या समर्थकांची पोटदुखी सुरु झाली आहे. त्यामुळे ते वीर सावरकरांचा फोटो का छापला अशी विचारणा करून जवाहरलाल नेहरूंचा फोटो न छापल्याने जो संताप निर्माण झाला आहे, ते वीर सावरकरांना विरोध करून शांत करत आहेत.
भारताच्या स्वातंत्र्याचे अग्रगण्य जवाहरलाल नेहरू यांना वगळून स्वतंत्रच अमृत महोत्सव साजरा करणे हे चुकीचे आणि अइतिहासी आहे. भारतीय इतिहास अनुसंधान परिषदेचा स्वतःला बदनाम करण्याचा हा आणखी एक प्रसंग. ही त्यांची एक सवय बनली आहे!, असे काँग्रेसचे नेते शशी थरूर म्हणाले.

काँग्रेसच्या विचार मांडण्याआधी लक्षात घ्या, देशासाठी अनेकांचे योगदान आहे. कुणीही कुणाचे योगदान नाकारू शकत नाही. त्यामुळे आपण खुल्या मनाने स्वीकारावे, असे नेटकरी म्हणतात.

देशप्रेमी भारतीय या नात्याने मी आनंदी आहे, ज्यांनी त्याग केला त्यांना अखेर सन्मान मिळाला. दीर्घकाळानंतर हे घडले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here