महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांच्या हत्येचा तपास सुरू आहे. त्यातच आता महत्त्वाची अपडेट हाती आली आहे. बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्या मारेकऱ्याला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे, अशी सूत्रांच्या हवाल्याने दिली जात आहे. मात्र मुंबई पोलिसांनी यावर पुष्टी केली नाही. बॉम्बब्लास्टमध्ये झिशान याचा समावेश आहे, पण त्यालाच अटक केली का, याची मुंबई पोलिस खात्री करत आहेत. (Baba Siddique)
( हेही वाचा : Shiv Sena UBT अद्याप वैफल्यग्रस्त; विधानसभा पराभावाचे खापर ‘ईव्हीएम’ वर)
भाजप नेत्याच्या घरी ब्लास्ट करण्याच्या प्रकरणात झिशान अख्तर (Zeeshan Akhtar) पंजाब पोलिसांच्या (Punjab Police) अटकेत असल्याची माहिती आहे. जालंदरमधील भाजपा (BJP) नेते मनोरंजन कालिया (Manoranjan Kalia) यांच्या घरी ब्लास्ट केल्याच्या प्रकरणात दोन जणांना केलेल्या अटकेत एक जण झिशान अख्तर हा देखील आहे. हा झिशान अख्तर (Zeeshan Akhtar) बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात फरार आरोपी असून मुंबई पोलीस त्याच्या मागावर होते. अशातच तो पंजाब पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती मिळत आहे. (Baba Siddique)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community