अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique Shot Dead) यांच्यावर शनिवारी रात्री वांद्रे परिसरातील खेरवाडी जंक्शनजवळ गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. बाबा सिद्दिकी (Baba Siddique) हे त्यांचा मुलगा झिशान सिद्दिकी (Zeeshan Siddiqui) यांच्या कार्यालयातून निघत असताना त्यांच्यावर हल्ला झाला. या घटनेनंतर आता राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
(हेही वाचा-Bangladesh: बांगलादेशात हिंदूंच्या प्रार्थनास्थळी होणाऱ्या हल्ल्यांवर केंद्र सरकारकडून गंभीर दखल)
या घटनेनंतर बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आमदार झिशान सिद्दीकी यांच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. सध्या झिशान सिद्दीकीच्या घराबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सध्या या ठिकाणी मुंबई पोलिसांचे आर.सी.पी दलही तैनात करण्यात आले आहे. बाबा सिद्दीकी यांच्या घराबाहेर पोलिसांनी बॅरिकेट्सही लावले आहेत. त्यामुळे त्यांच्या घरामध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नाही. (Baba Siddique Shot Dead)
नेमकं काय घडलं?
बाबा सिद्दीकी शनिवारी संध्याकाळी त्यांच्या वांद्रे येथील निर्मल नगरमधील ऑफिसमध्ये बसले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा आमदार झिशान सिद्दीकीही होते. फटाके फोडून बाबा सिद्दीकी घरी जाणार होते. विजयादशमी असल्याने या परिसरातून देवीच्या मिरवणुका जात होत्या. त्यामुळे या परिसरात वाद्यांचा आणि फटाक्यांचा आवाज होता. त्यामुळे ते सव्वा नऊ ते साडेनऊच्या सुमारास ऑफिसमधून बाहेर पडले. फटाके वाजवत असतानाच एक गाडी आली आणि त्यातून तिघे उतरले. (Baba Siddique Shot Dead) या तिघांनी तोंडाला रुमाल बांधलेला होता. गाडीतून उतरताच फटाक्याच्या आवाजात त्यांनी सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडल्या. एकूण पाच राऊंड फायर कण्यात आले. त्यातील एक गोळी बाबा सिद्दीकी यांच्या छातीवर लागली. त्यामुळे ते खाली कोसळले. आजूबाजूच्या लोकांनी तात्काळ धाव घेऊन बाबा सिद्दीकी यांना रुग्णालयात नेले. पण त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. (Baba Siddique Shot Dead)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community