Baba Siddiqui यांचा काँग्रेस पक्षाला रामराम; काँग्रेसला दुसरा झटका

541
आगामी लोकसभा 2024 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशासह अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर राजकारण सुरू झाले आहे. काँग्रेस पक्षाला तर लागोपाठ दोन झटके मिळाले आहेत. आधी मिलींद देवरा यांनी काँग्रेस सोडली, आता मुंबईतील वांद्रे पूर्व येथील काँग्रेस नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddiqui) यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. सिद्दिकी आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातील, अशी चर्चा आहे. काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दिकी (Baba Siddiqui) यांनी त्यांच्या काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनाम्याची माहिती स्वतः ट्विट करून दिली आहे.

काय म्हटले  बाबा सिद्धीकी यांनी ट्विटमध्ये? 

बाबा मी तरुणपणात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात सामील झालो आणि 48 वर्षांचा हा एक महत्त्वाचा प्रवास आहे. आज मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. ही एक अतिशय गोष्ट आहे जी मी व्यक्त करू इच्छितो. मला व्यक्त करायला खूप काही आवडले असते पण ते म्हणतात त्याप्रमाणे काही गोष्टी न सांगितल्या जातात.
या प्रवासात सहभागी झालेल्या सर्वांचे मी आभार मानतो. पण काही गोष्टी सांगितल्या जात नाहीत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.