अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique Shot Dead) यांच्यावर शनिवारी रात्री वांद्रे परिसरातील खेरवाडी जंक्शनजवळ गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. बाबा सिद्दिकी (Baba Siddique) हे त्यांचा मुलगा झिशान सिद्दिकी (Zeeshan Siddiqui) यांच्या कार्यालयातून निघत असताना त्यांच्यावर हल्ला झाला. या घटनेनंतर आता राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तसेच या या घटनेनंतर राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी राज्यमंत्री, विधिमंडळात प्रदीर्घकाळ राहिलेले माझे सहकारी बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना अत्यंत दुर्दैवी निषेधार्ह आणि वेदनादायी आहे. या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी राज्यमंत्री बाबत सिद्दिकी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली. (Ajit Pawar)
(हेही वाचा – Bangladeshi Hindu : बांगलादेशने हिंदूंना संरक्षण देण्याची भारत सरकारची मागणी)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘एक्स’च्या माध्यमातून म्हटले आहे की, या घटनेची सखोल चौकशी करुन हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात येईल. हल्ल्यामागच्या सूत्रधारही शोधण्यात येईल, असेही अजित पवार म्हणाले. बाबा सिद्दीकी यांच्या निधनामुळे अल्पसंख्यांक बांधवांसाठी लढणारा, सर्वधर्मसमभावासाठी प्रयत्न करणारा एक चांगला नेता आपण गमावला आहे. त्यांचे निधन हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) मोठे नुकसान आहे. झीशान सिद्दीकी, सिद्दीकी कुटुंबिय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दुःखात मी सहभागी असल्याचेही असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community