Zishan Siddiqui : काँग्रेस सोडलेले बाबा सिद्दिकींचा मुलगा झीशान सिद्दीकीही राष्ट्रवादीच्या वाटेवर?

152

काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसला राम राम करता अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आमदार झीशान सिद्दिकी (Zishan Siddiqui) यांची काँग्रेसने मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली आहे. त्यांच्या जागी अखिलेश यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे झिशानही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवर राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता आहे

(हेही वाचा Muslim : छत्रपती संभाजी नगरातून अटक केलेला महमंद झोएब खान करणार होता हिंदुत्ववादी नेत्यांवर हल्ले)

झीशान सिद्दिकी (Zishan Siddiqui) हे वांद्रे (पूर्व) येथील आमदार आहे, त्यांनी वडिलांनी काँग्रेस सोडण्यापूर्वीच अजित पवार आणि इतर नेत्यांची भेट घेतली होती.  बाबा सिद्दीकी यांनी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात काँग्रेस सोडली होती. यावेळी बोलताना सिद्दिकी यांनी काँग्रेसचे दिवंगत खासदार सुनील दत्त यांच्या राजकीय कारकिर्दीतील भूमिका मान्य केली. सिद्दिकी म्हणाले की, त्यांनी राष्ट्रवादीत जाण्यापूर्वी त्यांचा आमदार मुलगा झीशान सिद्दिकी (Zishan Siddiqui) आणि काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांचा सल्ला घेतला होता. मुंबई काँग्रेसचा एक प्रमुख मुस्लिम चेहरा, सिद्दीकी यांनी महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस युतीची सत्ता असताना मंत्री म्हणूनही काम केले होते.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.