बाबासाहेबांच्या संविधानामुळे कोणी मुख्यमंत्री तर कोणी उपमुख्यमंत्री : Eknath Shinde

109
बाबासाहेबांच्या संविधानामुळे कोणी मुख्यमंत्री तर कोणी उपमुख्यमंत्री : Eknath Shinde
बाबासाहेबांच्या संविधानामुळे कोणी मुख्यमंत्री तर कोणी उपमुख्यमंत्री : Eknath Shinde

देशाची समृद्धी ही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar) यांनी देशाला दिलेल्या संविधानामुळे आहे. त्यांच्या विचार, आचारांवर शासनाचा कारभार सुरू आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या विचारांनुसारच लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून दुर्बलांना सशक्त करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले.

हेही वाचा- US California Earthquake: अमेरिकेत ७.० रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, त्सुनामीचाही इशारा

मुंबईतील दादरच्या चैत्यभूमी (Chaityabhoomi) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेबांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात श्री. शिंदे म्हणाले, सत्ता हे समाज परिवर्तनाचे हत्यार आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणत असत. त्याचा उपयोग शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून समाज कल्याणासाठी केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विद्वत्तेचा उपयोग तळागाळातील लोकांना सशक्त करण्यासाठी केला. त्यांनी केवळ भारतातच नाही, तर जगभरातील मानवी हक्कांच्या प्रतिष्ठेला वैचारिक संघटनात्मक बळ मिळवून दिले आहे. त्यांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने प्रत्येक तालुक्यात संविधान मंदिर बांधण्याचा निर्णयही घेण्यात आला असल्याचे ते म्हणाले. (Eknath Shinde)

हेही वाचा-Nashik Rain : नाशिकमध्ये मुसळधार पाऊस ; शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान, जनजीवनही विस्कळीत 

“बाबासाहेबांच्या संविधानामुळे कोणी मुख्यमंत्री झाला, कोणी उपमुख्यमंत्री. मी नेहमी म्हणतो एक सर्वसामान्य कार्यकर्ता होतो, समाजकारण करता, करता, राजकारणात कसं आलो, कळलच नाही. एका सामान्य कुटुंबातून आलेला कार्यकर्ता या पदापर्यंत पोहोचू शकला. काल आझाद मैदानात ऐतिहासिक शपथविधी झाला. देवेंद्रजींनी मुख्यमंत्रीपदाची, आम्ही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिपदाची आम्ही शपथ घेतली. खरं म्हणजे ती संविधानाची शपथ होती. कालच्या समारंभात बाबासाहेब होते. आजही आपल्यासोबत आहेत. बाबासाहेब कायमच आपल्यासोबत आहेत. चंद्र, सूर्य आणि सत्य या सोबत चौथी कायमस्वरुपी परमनंट आपल्यासोबत असलेली गोष्ट म्हणजे बाबासाहेबांच संविधान.” असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा-“हिच तर महाराष्ट्रविरोधी कोती मनोवृत्ती”, Keshav Upadhyay यांचा उद्धव ठाकरे-शरद पवारांना टोला 

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार सर्वश्री प्रवीण दरेकर, राजकुमार बडोले, मंगलप्रभात लोढा, दीपक केसरकर, संजय बनसोडे, कालिदास कोळंबकर, अमोल मिटकरी, मुख्य सचिव सुजाता सौनिक, माजी खासदार सर्वश्री नरेंद्र जाधव, राहुल शेवाळे, अमर साबळे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी, कोकण विभागीय आयुक्त राजेश देशमुख, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, समन्वय समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे आदींसह समाजाच्या सर्वक्षेत्रातील मान्यवर तसेच डॉ. बाबासाहेबांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Eknath Shinde)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.