शिंदे-भाजपसोबत युती नाही, फक्त पाठिंबा; जागावाटपावरील बावनकुळेंच्या वक्तव्यावर बच्चू कडूंचे खळबळजनक विधान

179

२०२४च्या विधानसभा निवडणुकीत भाजप २४० जागा लढवण्याच्या तयारीत असल्याचे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी पक्षाच्या प्रवक्त्यांपुढे केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राज्यात विधानसभेच्या एकूण २८८ जागा आहेत. भाजपा त्यापैकी २४० जागेंवर जर निवडणूक लढवणार असेल तर शिवसेनेचा शिंदे गट आणि मित्रपक्षांना फक्त ४८ जागा मिळतील. याच पार्श्वभूमीवर बोलताना प्रहारचे जनशक्ती पक्षाला आमदार बच्चू कडू यांनी खळबळजनक विधान केले आहे.

एका मराठी वृत्तवाहिनीसोबत बोलत असताना बच्चू कडू म्हणाले की, ‘हे त्यांचे व्यक्तिगत आहे. आमची सध्या भाजप, शिंदे गटासोबत युती नाहीये. फक्त पाठिंबा दिलाय. जेव्हा युती होईल तेव्हा पाहू.’

संजय शिरसाटांचा बावनकुळेंवर पलटवार

शिंदेच्या शिवसेनेचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी जागावाटपावरील विधानावरून बावनकुळेंवर पलटवार केला. बावनकुळेंनी केलेल्या वक्तव्यामध्ये काही दम नाही. बावनकुळेंना एवढे कोणी अधिकार दिलेले नाहीत, असे म्हणत संजय शिरसाटांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला.

बावनकुळेंनी केली सारवासारव

दरम्यान बावनकुळेंच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत असल्याने आता त्यांनी सारवासारव केली आहे. अशी कोणतीही चर्चा कोअर टीममध्ये झालेली नाही. मला याची माहिती नाही, असे म्हणत त्यांनी आपल्या वक्तव्यांवरुन सारवासारव केली आहे.

(हेही वाचा- २८८ जागा भाजप चिन्हावरच लढवल्या जातील, त्यानंतर शिंदे गटाचे नामोनिशाणही राहणार नाही – जयंत पाटील)

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.