मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरविरोधात प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu vs Sachin Tendulkar) व त्यांचे कार्यकर्ते आता आक्रमक झाले आहेत. बच्चू कडूंनी सचिन तेंडुलकरकडे भारतरत्न पुरस्कार परत करण्याची मागणी केली आहे. यासाठी ३० ऑगस्टपर्यंतची मुदत त्यांनी दिली होती. मात्र, तोपर्यंत सचिन तेंडुलकरकडून कोणताही प्रतिसाद न आल्यामुळे आता बच्चू कडू व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज सकाळी सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर प्रहारच्या कार्यकर्त्यांसह बच्चू कडू स्वत: आंदोलनात सहभागी झाले होते. तसेच, आता सचिन तेंडुलकरला कायदेशीर नोटीसही पाठवण्यात आल्याचं बच्चू कडूंनी सांगितलं आहे.
सचिन ऑनलाईन गेमिंगची (Bacchu Kadu vs Sachin Tendulkar) जाहीरात करतो आणि याच मुद्द्यावरुन बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. बच्चू कडूंसह आंदोलन करणाऱ्या सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, ऑनलाईन गेमिंगची जाहीरात करत असल्याच्या मुद्द्यावरुन बच्चू कडू यांनी यापूर्वीही सचिन तेंडुलकरवर नाराजी व्यक्त केली होती.
(हेही वाचा – Manipur Violence : गोळीबारात दोन जण ठार; ७ जखमी)
दिलेल्या वेळेत सचिन (Bacchu Kadu vs Sachin Tendulkar) यांनी अभिप्राय दिलेला नाही. त्यामुळे ३० तारखेला नोटीस दिल्यानंतर आम्ही आंदोलनाची दिशा ठरवू. भारतरत्न असलेल्या माणसाने काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे, हे ठरवावं असं बच्चू कडू यांनी सांगितलं होत.
बच्चू कडू म्हणाले की, भारतरत्न सचिन तेंडुलकर (Bacchu Kadu vs Sachin Tendulkar) हे ऑनलाईन गेमबाबतची जाहिरात करतात. त्यामुळे युवा पिढी अशा खेळांकडे आकर्षित होते. पैशासाठी अशी जाहिरात करणे योग्य नाही. त्यांनी अशा जाहिराती करु नये अशी आम्ही त्यांना यापूर्वी विनंती केली आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे युवा वर्ग प्रभावित होतो, असं कडू यांनी स्पष्ट केलं.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community