गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी आणि ठाकरे गट जनतेपर्यंत आपली भूमिका मांडण्यासाठी वेगवेगळ्या सभा घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ (Vajramuth Sabha) सभा सोमवार १ मे रोजी वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथे संपन्न झाली. यावेळी राष्ट्रवादी पक्षाकडून विरोधी पक्षनेते अजित पवार आणि आमदार जितेंद्र आव्हाडांनी भाषणं केली. (Bachchu Kadu)
(हेही वाचा – Devendra Fadnavis : ‘योग्य वेळी निवडणूका घेऊ आणि’ … देवेंद्र फडणवीस यांचं माविआच्या टीकेला उत्तर)
या सभेच्या पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी मोठे भाष्य केले आहे. “वज्रमूठ सभेत सगळे पक्ष एकत्र दिसत असले तरी येत्या काळात कोणता पक्ष कुठे असेल? हे सांगता येत नाही. राज्यात लवकरच पुन्हा वादळ येईल आणि ‘वज्रमूठ’ तुटेल” असं सूचक विधान बच्चू कडू यांनी केलं आहे. त्यामुळे पुन्हा चर्चा सुरु झाली आहे.
हेही पहा –
नेमके काय म्हणाले बच्चू कडू?
“आज सभा घेतली आहे, पण येत्या काळात कोणता पक्ष कुठे जाईल? उद्या कोण कुठे असेल? हे सांगता येत नाही. राज्यात पुन्हा वादळ येईल आणि वज्रमूठ कधी तुटेल, हेही सांगता येत नाही. हे निश्चित आहे, असं मला वाटत नाही. सभेला इतक्या मोठ्या संख्येन लोक येत आहेत, पण नेते कुठे आहेत? राहुल गांधी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत फिरले. त्यावेळी लोकांमध्ये त्यांच्याबद्दल चांगली आस्था निर्माण झाली होती. पण नेतेच गायब व्हायला लागले.” अशा भाषेत बच्चू कडू यांनी आपले मत मांडले आहे. (Bachchu Kadu)
Join Our WhatsApp Community