राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यावर दाखल झालेल्या अपहार प्रकरणाच्या गुन्ह्यातील जामिनावरील सुनावणी आज बुधवारी दुपारी 1 वाजता होणार आहे. या सुनावणीदरम्यान तपास अधिकारी यांनाही हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.
कोणता होता बच्चू कडूंवर आरोप
वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. धैर्यवर्धन फुंडकर यांनी पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर रस्त्याच्या बांधकामांमध्ये अपहार केल्याचा आरोप केला होता. त्यासंदर्भात त्यांनी पोलिसात तक्रारही केली होती. पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल न केल्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशाने सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात अपहारासह विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाले होते. जवळपास एक कोटी 95 लाख रुपयांच्या रस्त्याच्या अपहाराचा आरोप पालकमंत्री कडू यांच्यावर लागला होता. त्यानंतर पालकमंत्री बच्चू कडू यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
(हेही वाचा – बाकीचे पक्ष राज ठाकरेंचा गेम करत आहेत, शिवसेनेच्या मोठ्या नेत्याचे मत)
9 मे पर्यंत अटकपूर्व जामीन
यासंदर्भात न्यायालयाने त्यांच्या अर्जावर सुनावणी करीत त्यांना 9 मे पर्यंत अटकपूर्व जामीन दिला होता. नियमित जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीमध्ये न्यायाधीशांनी तपास अधिकारी यांना पुढील सुनावणीमध्ये उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहे. त्यानंतर आज 11 मे रोजी दुपारी 1 वाजता सुनावणी होणार पार पडणार असून साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
Join Our WhatsApp Community