सध्या अमरावतीमध्ये महाआघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांसह बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनेही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. महायुतीकडून भाजपच्या चिन्हावर नवनीत राणा निवडणूक लढवत आहेत तर महायुतीचे घटक पक्ष बच्चू कडू (Bachchu Kadu)यांनी राणा यांच्या विरोधात उमेदवार उभा केला आहे. प्रचारात आमदार रवी राणा यांनी कडू यांच्या उमेदवारावर व्यक्तीगत टीका केल्यावर कडू यांनी आम्हीही वव्यक्तीगत टीका केली तर कठीण होईल, असा इशारा दिला.
आमदार रवी राणा यांनी प्रचारादरम्यान प्रहारचे उमेदवार दनेश बूब यांच्यावर टीका केली होती. तसेच ते जुगार खेळतात, मद्यप्राशन करतात असा आरोपही केला होता. या आरोपांना आता आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी उत्तर दिलं आहे. बच्चू कडू म्हणाले, रवी राणांनी दिनेश बूब किंवा इतर कुठल्याही नेत्यावर व्यक्तीगत टीका करू नये. आम्ही जर त्यांच्या व्यक्तीगत गोष्टी बाहेर काढल्या तर ते त्यांना कठीण जाईल. त्यामुळे त्यांनी असं करू नये. सार्वजनिक जीवनात तो माणूस म्हणजेच दिनेश बूब हा रवी राणांपेक्षा लाख पटीने चांगला आहे. त्यांनी ज्या पद्धतीने कामं केली आहेत ते पाहता मला नाही वाटत की, रवी राणा हे त्यांची बरोबरी करू शकतील. आपण तर त्यांचे (नवनीत राणा) चित्रपटातले सीन (प्रसंग) पाहिले तर त्यात ते खुलेआम मद्यप्राशन करताना दिसतात. मात्र आम्ही या गोष्टी काढायला नाही पाहिजेत आणि आम्ही तो नियम पाळतो. तुम्ही इतक्या खालच्या पातळीवर जात असाल तर तुमच्याही गोष्टी बाहेर येतील. व्यक्तिगतरित्या इतक्या खालच्या पातळीवर जाऊन आरोप करणं योग्य नाही.
(हेही वाचा Love Jihad मध्ये प्राण गमावलेल्या हिंदू मुलीचे वडील काँग्रेसच्या नगरसेवकाची जे.पी. नड्डा यांनी घेतली भेट)
बच्चू कडू (Bachchu Kadu) म्हणाले, नवनीत राणा यांना पाडण्यासाठी सर्वात मोठा हातभार कोणाचा असेल तर तो रवी राणांचा असेल. त्यांची जी भाषा आहे आणि ते व्यवस्थित वागले असते तर ही वेळ आली नसती. पण आता नवनीत राणा यांना निवडणुकीमध्ये पाडण्याचे श्रेय रवी राणा यांना जाईल.
Join Our WhatsApp Community