Badlapur School Girl Rape Case: मविआ नेत्यांची दुतोंडी भूमिका उघड करण्यासाठी भाजपाचे आंदोलन

158
Badlapur School Girl Rape Case: मविआ नेत्यांची दुतोंडी भूमिका उघड करण्यासाठी भाजपाचे आंदोलन
Badlapur School Girl Rape Case: मविआ नेत्यांची दुतोंडी भूमिका उघड करण्यासाठी भाजपाचे आंदोलन

बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर (Badlapur School Girl Rape Case) झालेल्या अत्याचारामुळे संपूर्ण देश हादरला आहे. महाराष्ट्रात तर या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. शनिवारी २४ ऑगस्ट रोजी सर्व विरोधी पक्षांनी (MVA) महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र, न्यायालयाने बंद पुकारता येणार नाही, असं स्पष्ट करत बंद मागे घेण्याचे निर्देश दिले. त्यानंतर विरोधी पक्षांनी बंद मागे घेत असल्याचं जाहीर केलं. तसेच, या काळात महाराष्ट्रभर विविध ठिकाणी दिवसभर आंदोलनं केली जातील, असंही स्पष्ट केलं.

बदलापूर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी भाजप रस्त्यावर

मविआला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपही (BJP) आंदोलन करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. हे आंदोलनही आज शनिवारी सकाळी 11 ते 12 दरम्यान केले जाईल. महिला अत्याचारप्रकरणी महाविकास आघाडीच्या नेत्यांची दुतोंडी भूमिका उघड करण्यासाठी हे आंदोलन केले जाणार असल्याचे भाजपच्यावतीने सांगण्यात आले आहे. शिवाय बदलापूर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी भाजप रस्त्यावर उतरणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. (Badlapur School Girl Rape Case)

आंदोलन विरूद्ध आंदोलन

मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) आणि भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, मादाम कामा रोड, मुंबई येथे आंदोलनात सहभागी होतील. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही या आंदोलनात नागपूरात सहभागी होणार आहेत. याशिवाय भाजपचे नेते आमदार प्रवीण दरेकर चवदार तळं, महाड येथे आंदोलनात सहभागी होणार आहेत. शिवाय भाजपचे आमदार प्रसाद लाड झाशीची राणी लक्ष्मीबाई पुतळा, सायन सर्कल येथे आंदोलनात सहभागी होतील अशी माहिती पक्षाच्यावतीने देण्यात आली आहे. त्यामुळे आंदोलन विरूद्ध आंदोलन अशी स्थिती निर्माण झाली आहे. (Badlapur School Girl Rape Case)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.