Sanjay Raut : संजय राऊत यांच्या गाडीवर फेकली चप्पलने भरलेली पिशवी; समर्थन करत कार्यकर्ता म्हणाला…

306
Sanjay Raut : संजय राऊत यांच्या गाडीवर फेकली चप्पलने भरलेली पिशवी; समर्थन करत कार्यकर्ता म्हणाला...
Sanjay Raut : संजय राऊत यांच्या गाडीवर फेकली चप्पलने भरलेली पिशवी; समर्थन करत कार्यकर्ता म्हणाला...

उबाठा गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) हे सोलापूर (Solapur) दौऱ्यावर आहेत. त्या वेळी रविवार, १० डिसेंबर रोजी त्याच पार्श्वभूमीवर सोलापूर – पुणे राष्ट्रीय महामार्गाजवळ (Solapur – Pune National Highway)  असेलल्या बाळे या गावात संजय राऊत एका हॉटेलच्या उद्घाटनासाठी आले होते. त्यावेळी सोलापूर शहराच्या दिशेने जात असताना संजय राऊत यांच्या गाडीवर चप्पलची पिशवीच फेकण्यात आली. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

सोलापुरात उबाठा गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या गाडीवर चप्पलफेक करण्यात आली. सोलापुरातील बाळे येथे एका हॉटेलच्या उद्घाटनासाठी संजय राऊत आले होते. त्या वेळी राऊतांच्या गाडीवर चप्पल फेकण्यात आली.

(हेही वाचा – Sumedha Warship At Kenya : भारतीय नौदलाचे जहाज ‘सुमेधा’ केनियामधील पोर्ट लामू येथे दाखल)

नारायण राणे समर्थनाच्या घोषणा

एकच चप्पल नाही, तर चप्पलने भरलेली पिशवीच फेकण्यात आली आहे. या प्रकाराच्या वेळी नारायण राणेंच्या समर्थनार्थ घोषणा देऊन आरोपी पसार झाले.

या प्रकरणी पोलीस आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते हे कार्यकर्त्यांचा शोध घेत आहेत. नारायण राणे (Narayan Rane) यांच्या समर्थनाच्या घोषणांवरून संजय राऊतांकडून सातत्याने राणे कुटुंबावर टीका केली जाते. त्यामुळे त्यातून हे कृत्य घडल्याची शक्यता आहे.

या ठिकाणी उबाठा गटाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी हॉटेलमालकाने सर्व शिवसैनिकांना शांत केले. त्यामुळे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा राडा किंवा गोंधळ झाला नाही.

(हेही वाचा – Sharmila Thackeray On Deepfake : ‘डीपफेक’वर शर्मिला ठाकरेही नाराज; म्हणाल्या, माझ्या मुलीलाही…)

… तर मी संजय राऊत यांच्या डोक्यात दगड घातले असते

संजय राऊत हे सातत्याने नारायण राणे, पंतप्रधान मोदी (PM Modi) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर टीका करत असतात. त्याचप्रमाणे त्यांनी मराठा मूक मोर्चाला देखील हिणवले. तो राग माझ्या मनात होता, त्यामुळेच मी संजय राऊत यांच्या गाडीवर चप्पलफेक केली. पुलावरून मला केवळ चप्पल मिळाल्या, त्यामुळे मी चप्पल फेकली. तिथे जर दगड असते तर मी संजय राऊत यांच्या डोक्यात दगड घातले असते. माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी बेहत्तर, पण मी माझ्या मनातील राग व्यक्त केला, असे चप्पल फेकणाऱ्या कार्यकर्त्याने सांगितले. (Sanjay Raut)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.