राज्यातील विधान परिषद निवडणुकीसाठी सोमवारी सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे. सर्वच पक्षांमध्ये होणाऱ्या या चुरशीच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत २७९ जणांनी मतदान केले असून अद्याप ६ आमदारांचे मतदान बाकी असल्याची माहिती मिळतेय. दरम्यान विधानभवन परिसरात बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांचे स्वागत काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात आले आहे. त्यामुळे बविआचं मतं काँग्रेसला मिळणार का? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळातून होताना दिसतेय.
(हेही वाचा – भाजपची रणनीती! अजित पवारांच्या भेटीला बावनकुळे; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण)
बविआ काय करणार?
विधान परिषद निवडणुकीत लहान पक्ष व अपक्ष आमदारांची १५ मतं असून, ती निर्णायक ठरणार आहेत. बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांच्या मतांसाठी भाजप, काँग्रेस आणि ‘राष्ट्रवादी’च्या उमेदवारांनी त्या पक्षाचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या भेटी घेतल्या. मात्र, त्यांनी अद्याप याविषयी काहीही भाष्य केलेलं नाही.
क्षितीज ठाकूर मुंबईत दाखल
बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार आहेत. ही मते मिळविण्यासाठी त्या आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांची प्रमुख उमेदवारांनी भेट घेऊन त्यांना ‘बविआ’च्या तीन मतांसाठी साकडे घातलं. बविआचे आमदार क्षितीज ठाकूर हे नातेवाइकाच्या उपचारांसाठी न्यूयॉर्कला गेले होते. मात्र मतदानाच्या दिवशी ते मुंबईत दाखल झाले आहेत.
Join Our WhatsApp Community