ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना पीएमएलए विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर राऊत तुरुंगाबाहेर कधी येणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. मात्र, संजय राऊत यांच्या जामिनाला ईडीने विरोध केला असून, स्थगिती देण्याची मागणी केली आहे. ईडी या जामिनाच्याविरोधात न्यायालयात अपील करणार आहे. त्यामुळे संजय राऊतांना जामीन तर मंजूर झाला आहे. परंतु ते तुरुंगाबाहेर येऊ शकणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विशेष न्यायालयात पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत आणि प्रविण राऊत या दोघांनाही जामीन मंजूर केला आहे. दरम्यान. ईडीने केलेल्या स्थगितीच्या मागणीबाबत विशेष न्यायालय तीन वाजता आपल निकाल सुनावणार आहे.
( हेही वाचा: मोठी बातमी! संजय राऊतांना शंभर दिवसांनी जामीन मंजूर )
काय घडले न्यायालयात ?
पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत आणि प्रविण राऊत यांना ईडीने अटक केली होती. या दोघांच्याही जामीन अर्जावर सुनावणी झाल्यानंतर, बुधवारी न्यायमू्र्ती देशपांडे यांनी आपला निकाल सुनावला. न्यायालयाने संजय राऊत आणि प्रविण राऊत यांना जामीन मंजूर केला. न्यायालयाच्या या निर्णयावर ईडीच्या वकिलांनी आक्षेप नोंदवला. ईडीकडून राऊतांच्या जामीनाला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली. हे छोटेमोठे प्रकरण नसून मोठी नावे यात सहभागी आहेत. त्यामुळे या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान देण्याकरता आम्हाला संधी मिळायलाच हवी, अशी मागणी ईडीच्या वकिलांनी केली आहे.
Join Our WhatsApp Community