नितेश राणेंना जामीन मंजूर, पण…

89

नितेश राणेंना संतोष परब हल्ला प्रकरणात न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने नितेश राणे यांचा जामीन मंजूर केला आहे. भाजप आमदार नितेश राणे यांना 30 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला  आहे.

सशर्त जामीन मंजूर

संतोष परब हल्लाप्रकरणात सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने भाजप आमदार नितेश राणे यांना जामीन मंजूर केला आहे. हा नितेश राणे यांच्यासाठी मोठा दिलासा मानला जात आहे. यापूर्वी सत्र न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. त्यानंतर नितेश राणे यांनी कणकवली दिवाणी न्यायालयासमोर आत्मसमर्पण करुन जामिनासाठी अर्ज केला होता. अखेर सत्र न्यायालयाने नितेश राणे यांना सशर्त जामीन मंजूर केला आहे. 30 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर नितेश यांना जामीन मंजूर करण्यात आल्याचे समजते.

( हेही वाचा: प्रियंका गांधी झाल्या ट्रोल! #Bikini का सुरु झाला ट्विटर ट्रेंड )

हे आाहे प्रकरण

18 डिसेंबर 2021 रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार केले होते. या हल्ल्यात परब जखमी झाले होते. या प्रकरणाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय शत्रुत्वाची पार्श्वभूमी असल्याच्या संशयावरून पोलिसांनी भाजपच्या गोटात चौकशीची सूत्रे हलवली आहेत. मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी दिल्लीतून अटक करण्यात यश मिळवले आहे. सातपुते हा भाजप आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे या प्रकरणात नितेश राणेंची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.