अश्लील चित्रफितीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या राज कुंद्रा याला मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी जामीन मंजूर केला. कुंद्रा याच्या विरोधात केलेल्या आरोपांची चौकशी पूर्ण झाली आहे, असा युक्तीवाद ऍड. निरंजन मुंदरगी यांनी या प्रकरणी न्यायालयात जामीन अर्जावर केला.
पीडितांनी स्वतः कुंद्राला संपर्क केलेला!
पुरवणी आरोपपत्रात राज कुंद्रा याच्या विरोधात कुठेही आरोप झालेले नाही. पुरवणी आरोपपत्रात एकही आरोप नाही. पीडितांनी अश्लील व्हिडिओ चित्रीकरणासाठी कुंद्राशी संवाद साधला होता किंवा संपर्क साधला होता, असा युक्तीवाद ऍड. मुंदरगी यांनी केला. सरकारी वकिलाने जामीन अर्जाला विरोध केला. केवळ आरोपपत्र दाखल केल्यामुळे जामीन मंजूर होत नाही. या प्रकरणाची थोडक्यात सुनावणी केल्यानंतर मुख्य महानगर दंडाधिकारी एस.बी भाजीपाले यांनी कुंद्राचा जामीन अर्ज मंजूर केला. ५० हजारांच्या जामीनपत्रावर कुंद्राची सुटका केली जाईल. कुंद्राला मुंबई पोलिसांनी अटक केली आणि एस्प्लेनेड येथील महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले होते. त्याला २३ जुलै २०२१ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. ती २७ जुलैपर्यंत वाढवण्यात आली. २८ जुलै रोजी त्याचा जामीन अर्ज महानगर न्यायदंडाधिकाऱ्यांनी फेटाळला होता.
(हेही वाचा : सोमय्यांच्या जीविताला धोका निर्माण करण्याचा कट! दरेकरांचा आरोप)
Join Our WhatsApp Community