पडळकरांनी मारली बाजी… पोलिसांच्या नाकावर टिच्चून बैलगाडा शर्यत

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी तालुक्यातील झरे गावात २० ऑगस्ट रोजी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. मात्र, ही शर्यत होऊ द्यायची नाही असा प्रशासनाने निर्धार केला होता. असे असताना सरकारच्या आणि पोलिसांच्या नाकावर टिच्चून भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या समर्थकांनी बैलगाडा शर्यत पार पाडली आहे. शुक्रवारी पहाटे पाच वाजता पडळकर समर्थकांनी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करत बैलगाडा शर्यत पार पाडली.

मैदान खोदले, तरी शर्यत पार पडली

शर्यतीच्या आदल्या दिवशी पोलिसांनी ज्या मैदानात शर्यत होणार आहे, त्याठिकाणी येऊन जेसीबीच्या सहाय्याने मैदान खोदले, त्यावर आडवे चरे मारण्यात आले. त्यामुळे अशा परिस्थिती मैदानात आता बैलगाड्या धावू शकणार नाहीत, अशी व्यवस्था करण्यात आली होती. या मैदानापासून काहीच अंतरावर आमदार पडळकर यांचे फार्म हाऊस आहे. बुधवारी, १९ ऑगस्टपासून पोलिसांनी झरे गावासह आजूबाजूच्या ९ गावांमध्ये संचारबंदी जाहीर केली आहे. त्याचबरोबर ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. सांगली पोलिसांनी कडेकोट पोलिस बंदोबस्त लावला होता. मात्र, तरी देखील ही शर्यत पहाटे पाच वाजता पार पडली.

काही शेतकऱ्यांनी, बैलगाडा चालक-मालकांनी बैलगाडा शर्यत पार पाडली असल्याचं आम्हाला प्रसारमाध्यमांतून कळत आहे. आम्ही अजून त्याठिकाणी गेलेलो नाही. झरे गावात मोठा पोलिस फौजफाटा होता. कायदा आणि सुवव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस प्रशासनाने आम्हाला विनंती केली होती. त्यांच्या विनंतीला मान आम्ही दिला, पण आता आम्हाला काही शेतकऱ्यांनी स्पर्धा पार पडली आहे, अशी माहिती दिली आहे.

 

-गोपीचंद पडळकर, आमदार भाजपा

पहा संपूर्ण व्हिडिओ-

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here