महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हिताच्या दृष्टीने राज ठाकरे भूमिका घेतील. 2014 ला आम्ही नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला होता. राज ठाकरेंच्या विचारांवर मतदान करणारी बरीच लोकं आहेत. आतापर्यंत आम्ही ‘एकला चालो रे’च्या भूमिकेत होतो. आता हिंदुत्वासाठी महायुतीत गोलो, तर वाईट वाटण्याचे काहीच कारण नाही. पूर्वी शिवसेनेत असताना आम्ही भाजपसोबत होतो, त्यामुळे आता एकत्र आलो, तर त्यात काही नवीन नाही, असे विधान मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी केले आहे.
(हेही वाचा – ‘मुस्लिम तुष्टीकरण’ छाप Congress च्या जाहिरनाम्याला उद्धव ठाकरेंचा पाठिंबा)
राज ठाकरे यांचा महायुतीला पाठिंबा
गेल्या अनेक दिवसांपासून राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) नेतृत्वातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) महायुतीत सहभागी होण्याची चर्चा सुरू होती. त्या पार्श्वभूमीवर गुढीपाडवा मेळाव्याच्या निमित्ताने बाळा नांदगावकर यांनी हे वक्तव्य केले आहे. ९ एप्रिल रोजी शिवाजी पार्कावर मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडला. या मेळाव्यात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा घोषित केला आहे. त्यापूर्वीच बाळा नांदगावकर यांनी हिंदुत्वाचे समर्थन केले आहे.
दरम्यान, मनसेचे आमदार राजू पाटील यांनीही महायुतीत जाण्यावर भाष्य केले. ते म्हणाले की, पूर्वीपेक्षा यंदा लोकांची जास्त गर्दी जमली आहे. हे सर्व जण एका अपेक्षेने येत आहेत. त्यामुळे राज ठाकरे आज जो निर्णय घेतील, तो महाराष्ट्राच्या हिताचाच असेल. तर, 2024 ची निवडणूक म्हणजे धर्मयुद्ध आहे. राज ठाकरेंची बाजू धर्माची बाजू आहे. तो जो निर्णय घेतील, तो धर्माचा असेल, असे मनसे नेते राजू पाटील यांनी म्हटले आहे. (Bala Nandgaonkar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community