लोकसभेच्या निकालानंतर (Lok Sabha Election) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (Maharashtra Navnirman Sena) आढावा बैठक राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पाडली. यामध्ये निवडणुकीच्या निकालानंतर मतदारसंघातील आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. तसेच लोकसभा निकालावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर लवकरच पुढील रणनीती ठरवली जाईल अशी प्रतिकिया मनसे नेते नितीन सरदेसाई (Nitin Sardesai) आणि बाळा नांदगावकरांनी (Bala Nandgaonkar) माध्यमांसमोर बोलतांना दिली. (Bala Nandgaonkar)
बैठकीनंतर मनसे नेते नितीन सरदेसाई म्हणाले की, शुक्रवारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. मुंबईसह पुणे, नाशिक, विदर्भ, मराठवाडा येथील महत्त्वाचे पदाधिकारी बैठकीत उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या निकालावर चर्चा झाली. त्या त्या भागातील परिस्थितीचा आढावा घेतला. असे विधान मनसे नेते सरदेसाई यांनी केले.
(हेही वाचा – Powai Lake जल प्रदूषणाच्या विळख्यातून होतोय मुक्त)
फोडाफोडीचं राजकारण कुणालाच आवडत नाही. त्याचा परिणाम होतोच. या निवडणुकीत ते दिसले. त्यामुळे आता जो कुणी फुटणार असेल तोदेखील भविष्याचा विचार करेल आणि इकडे तिकडे जाईल. आम्ही जसं एका जागेवर घट्ट आहोत तसे तेदेखील राहतील असं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलं.
(हेही वाचा – Mhada Home Mumbai: मुंबईकरांनो स्वत:च्या हक्काचं घर घेण्याची इच्छा पूर्ण होणार, म्हाडाने उभारली ३६०० घरे, जाणून घ्या नेमके ठिकाण कुठले? )
त्याशिवाय निवडणूक निकालाच्या आदल्या दिवशी ३ जूनला देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी कोकण पदवीधर मतदारसंघात मनसेनं उमेदवार देऊ नये अशी वैयक्तिक विनंती केली होती. त्या विनंतीस मान देऊन राज ठाकरेंनी ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. मात्र या गोष्टी वारंवार होऊ शकत नाही ते राज ठाकरेंनी फडणवीसांना सांगितले अशीही माहिती सरदेसाई यांनी माध्यमांना दिली.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community