Balasaheb Thackeray Birth Anniversary : पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली आदरांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण केले आहे. मोदींनी आपल्या पोस्टमध्ये लिहलं आहे की; "बाळासाहेबांचे त्यांच्या जयंतीनिमित्त स्मरण. ते एक महान व्यक्तिमत्व होते.

197
Balasaheb Thackeray Birth Anniversary : पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली आदरांजली

महाराष्ट्राचे आणि देशाच्या राजकारणातील मोठे नाव असलेले हिंदुहृदयसम्राट आणि शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray Birth Anniversary) यांना कोण ओळखत नाही. मराठी माणसांच्या हक्कासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी लढा दिला.

(हेही वाचा – Veer Surendra Sai : ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढा देणारे महान क्रांतिकारक वीर सुरेंद्र साई)

आज (23 जानेवारी) बाळासाहेबांची ९८ वी जयंती आहे. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray Birth Anniversary) यांच्या जयंतीनिमित्त देश आणि महाराष्ट्रातील अनेक मोठ्या नेत्यांनी ट्विट करून त्यांचे स्मरण केले आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही समावेश आहे.

बाळासाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली –

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त (Balasaheb Thackeray Birth Anniversary) त्यांचे स्मरण केले आहे. मोदींनी आपल्या पोस्टमध्ये लिहलं आहे की; “बाळासाहेबांचे त्यांच्या जयंतीनिमित्त स्मरण. ते एक महान व्यक्तिमत्व होते, ज्यांचा महाराष्ट्राच्या राजकीय आणि सांस्कृतिक परिदृश्यावरील प्रभाव अतुलनीय आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे, त्यांच्या आदर्शांबद्दलच्या अविचल समर्पणामुळे आणि गरीब आणि वंचितांसाठी बोलण्याच्या वचनबद्धतेमुळे ते असंख्य लोकांच्या हृदयात जिवंत आहेत.”

(हेही वाचा – Ranjit Savarkar : लक्ष्मणाच्या नगरीत झालेले सैनिकी संचालन ही प्रभु रामचंद्राला दिलेली शक्तिवंदना – रणजित सावरकर)

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री – 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ट्विटरवर लिहिले की, “वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray Birth Anniversary) यांना जयंतीदिनी त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.” तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लिहिले की, हिंदूहृदयसम्राट, वंदनीय शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी कोटी कोटी प्रणाम!”

 

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.