शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या अकराव्या स्मृतिदिना निमित्त बाळासाहेंबाना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दाखल झालेत. तर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातूनही अभिवादन केलंय. भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी बाळासाहेबांच्या स्मृतिदनी पोस्ट करत मातोश्री बंगला जनतेसाठी खुले करण्याची मागणी केली आहे. बाळासाहेब ज्या मातोश्री बंगल्यामध्ये अनेक वर्ष राहिले ,तो बंगला जिवंत स्मारक म्हणून जनतेसाठी खुला करावा अशी मागणी राम कदम यांनी पोस्ट करत केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी भाजपनं एक महत्त्वाची मागणी केली असून त्यामुळं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Balasaheb Thackeray Death Anniversary )
भाजपचे प्रवक्ते आमदार राम कदम यांनी ‘एक्स’वर या संदर्भात पोस्ट केली आहे. ‘राम कदम यांनी स्मृतिदिनानिमित्त बाळासाहेबांना अभिवादन केलं आहे. अभिवादन करतानाच त्यांनी बाळासाहेबांच्या स्मारकाच्या मुद्द्यावरही भाष्य केलं आहे.बाळासाहेब ठाकरे ज्या मातोश्री बंगल्यात राहिले. तेच खरे बाळासाहेबांचे खरे जिवंत स्मारक आहे. ते जनतेसाठी कधी खुले करणार? असा सवाल राम कदम यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे. राम कदम म्हणाले, उद्धव ठाकरे सध्या राहायला मातोश्री -२ वर गेले आहेत. जुन्या मातोश्री बंगल्यात बाळासाहेब अनेक वर्ष राहिले. अनेक धाडसी निर्णय ज्या बंगल्यात त्यांनी घेतले. दिवस रात्र त्यांचा ज्या स्थळी वावर होता. तेच खरे जिवंत स्मारक जनतेसाठी का खुले नाही?
आज स्वर्गीय #बाळासाहेबांचा स्मृती दीन…
ज्या #मातोश्री बंगल्यात स्वर्गीय बाळासाहेब अनेक वर्ष राहिले..
तेच खरे जिवंत स्मारक जनतेसाठी का खुले नाही ?
अनेक धाडसी निर्णय ज्या बंगल्यात त्यांनी घेतले.. दिवस रात्र त्यांचा ज्या स्थळी वावर होता..
खऱ्या अर्थाने तीच वास्तू देशभरातल्या… pic.twitter.com/3ftphoD2Iy
— Ram Kadam (@ramkadam) November 17, 2023
उद्धवजी ही वास्तू कुठलीही सबब न देता कधी खुली करणार
राम कदम पुढे म्हणाले, मातोश्री ही वास्तू खऱ्या अर्थाने देशभरातल्या जनतेसाठी प्रेरक आहे. त्यांनी वापरलेल्या वास्तूपासून त्यांचे ऑफिस, त्यांची राहण्याची खोली सर्वच काही अद्भूत प्रेरक आहे. ही वास्तू स्वर्गीय बाळासाहेबांचे खरे जिवंत स्मारक म्हणून जनतेसाठी कोणतीही सबब न देता उद्धवजी कधी खुली करणार? स्वतःला राहण्यासाठी मातोश्री -२ झालाच आहे. ही भावना प्रत्येक बाळासाहेबांना मानणाऱ्यांची आहे.
(हेही वाचा : Maratha Reservation : “… तर दोन तासांत आरक्षण मिळेल” – मनोज जरांगे पाटील)
Join Our WhatsApp Community