Balasaheb Thackeray यांनी तेव्हाच सांगितले होते ‘बटेंगे तो कटेंगे’; व्हिडीओ होतोय व्हायरल

73

लोकसभा निवडणुकीत देशभरात एकजात मुसलमानांनी भाजपाच्या विरोधात मतदान केले. त्यानंतर हरियाणा विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ असा नारा दिला. त्यामुळे हिंदूंनी भरभरून भाजपाला मतदान केले आणि तिथे भाजपाची सत्ता आली. म्हणून सध्या सुरु असलेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतही भाजपाने हाच नारा दिला. त्याला मविआतील सर्व घटक पक्ष विरोध करू लागले आहेत. उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही विरोध केला आहे. मात्र ज्या बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे वशंज म्हणवणारे उद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांनीच ‘बटेंगे तो कटेंगे’ हा नारा दिला होता, याचा विसर पडला आहे का, कारण सध्या बाळासाहेबांचा तो व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.

काय म्हणाले होते बाळासाहेब ठाकरे त्या व्हिडीओमध्ये? 

शपथ घ्यायची तर ही घ्या, जसे ते एकवटले, तसे आम्हीसुद्धा एकवटल्याशिवाय राहणार नाही. तर आणि तरच या लांड्यांना तुम्ही टक्कर मारू शकाल. नाहीतर मुंबईच काय महाराष्ट्र गिळतील, देश गिळतील. ते पाप आपल्याकडून होता कामा नये. त्याला आपण पुरून उरू हो, त्याला आपण भीत नाही. पण नुसता फतवा गेला तेव्हा सगळेजण एकजुटीने, रांगेने गेले, आणि आम्ही परदेशात फिरायला जातो.

(हेही वाचा राहुल गांधींना धारावी प्रकल्प शेखला द्यायची इच्छा; Vinod Tawde यांचा घणाघात)

शिवसैनिकांमध्येच नाराजी?

ज्याप्रकारे ऑल इंडिया मुस्लिम लीगचे प्रमुख साजाद नोमानी यांनी मुसलमानांना निवडणुकीत भाजपा आणि मित्रपक्षाला हरवण्यासाठी मुसलमानांनी मतदानासाठी एकजात घराबाहेर पडावे आणि वोट जिहाद करावा, असे आवाहन केले. हे वास्तव तेव्हाही बाळासाहेबांनी (Balasaheb Thackeray) ओळखले होते आणि म्हणूनच वरीलप्रमाणे त्यांनी हिंदूंना ‘मुसलमान एका फतव्यावर रांगेच्या रंग लावून मतदानाला बाहेर पडतात आणि हिंदू मात्र मतदानाच्या दिवशी परदेशात फिरायला जातात’, अशी शोकांतिका मांडतानाच, ‘असेच होत राहिले तर महाराष्ट्राचं नव्हे तर मुसलमान देश गिळून टाकतील’, अशी भीती व्यक्त केली होती. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक है तो सेफ है’ असा नारा दिला, मुख्यमंत्री योगी यांनी बटेंगे तो कटेंगे असा नारा दिला, त्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे हे विरोध करत आहे, यावर शिवसैनिकच तीव्र नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.